'लेडी सिंघम' ही येणार, दीपिका पदुकोणच्या भूमिकेवर रोहित शेट्टी आणणार स्वतंत्र सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:51 IST2024-11-12T16:50:44+5:302024-11-12T16:51:44+5:30
कधी येणार लेडी सिंघम? रोहित शेट्टीने दिली माहिती

'लेडी सिंघम' ही येणार, दीपिका पदुकोणच्या भूमिकेवर रोहित शेट्टी आणणार स्वतंत्र सिनेमा
रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' (Singham Again) नुकताच रिलीज झाला. अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ,करिना कपूर, अक्षय कुमार यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. दीपिका पदुकोण सिनेमात लेडी सिंघम आहे. दरम्यान दीपिकाच्या कॅरेक्टरवर स्वतंत्र सिनेमा आणणार असल्याची घोषणा रोहित शेट्टीने केली होती. त्या संदर्भात त्याने नुकतंच अपडेट दिलं आहे.
दीपिका पदुकोणने 'सिंघम अगेन' मध्ये शक्ती शेट्टी ही लेडी सिंघमची भूमिका केली. बाजीराव सिंघमनेच तिला अनेक गोष्टी शिकवल्या असतात. त्यामुळे ती त्यांच्या हाताखालीच तयार झालेली असते. या लेडी सिंघमवर रोहित शेट्टी वेगळा सिनेमा काढण्याच्या तयारित आहे. याबद्दल तो म्हणाला, "आमच्या डोक्यात एक कल्पना आहे. पण ही आम्ही नक्की कुठपर्यंत घेऊन जाऊ शकू आणि हे कधीपर्यंत तयार होईल याबद्दल सध्या काहीच सांगता येत नाही."
रोहित शेट्टीने हे उत्तर देताना 'लेडी सिंघम' नक्की येणार हे मात्र कन्फर्म केले आहे. सध्या रोहित 'सिंघम अगेन'चं यश एन्जॉय करत आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी सिनेमा रिलीज झाला. काहीच दिवसात सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केला. 'रामायण'थीमवर सिनेमा आधारित आहे.