Video: गाणं गात असतानाच अचानक स्टेजवर कोसळला 'रॉकस्टार' गायक मोहित चौहान, चाहत्यांना काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:47 IST2025-12-09T12:46:16+5:302025-12-09T12:47:22+5:30
रॉकस्टार, तमाशा सिनेमातील गाण्यांनी प्रसिद्ध झालेला गायक मोहित चौहानचा काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. जाणून घ्या

Video: गाणं गात असतानाच अचानक स्टेजवर कोसळला 'रॉकस्टार' गायक मोहित चौहान, चाहत्यांना काळजी
बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक मोहित चौहानने नुकताच भोपाळमधील एम्स कॉलेज फेस्टमध्ये परफॉर्मन्स केला. 'सड्डा हक', 'तुम से ही', 'तुझे भुला दिया', 'इलाही' अशा अनेक सुपरहिट गाण्यांनी मोहितने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पण त्यापैकी एका व्हिडिओने त्याच्या चाहत्यांना काळजीत टाकले आहे. गाणं गात असतानाच अचानक मोहित स्टेजवर जोरात पडला. काय घडलं नेमकं?
स्टेजवर पाय घसरून पडला मोहित
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोहित चौहान त्याच्या सुपरहिट 'रॉकस्टार' चित्रपटातील 'नादान परिंदे' हे गाणं गाताना दिसतो. गाणं गात असताना तो प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी स्टेजच्या मागच्या बाजूने जात होता. याचवेळी, त्याचा पाय स्टेजवरील एका ठिकाणी अडकला आणि त्याचा तोल जाऊन तो स्टेजवर जोरात पडला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, हे दृश्य पाहून उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
सुदैवाने हा कार्यक्रम एम्समध्ये आयोजित केल्यामुळे, कॉन्सर्टचे आयोजक आणि वैद्यकीय पथक त्वरीत मोहित चौहानच्या मदतीसाठी धावले. डॉक्टरांनी तात्काळ स्टेजवर येऊन त्याची तपासणी केली. सुदैवाने, या घटनेत मोहितला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु काळासाठी थांबवण्यात आला होता. त्यानंतर मोहितने पुन्हा त्याच्या गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. एकूणच किरकोळ दुखापत झाली असली तरीही मोहितने प्रेक्षकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही.