क्रिकेटपटूसोबत जोडलेलं नाव! आरजे महावशची थेट बॉलिवूड चित्रपटात लागली वर्णी, 'हा' अभिनेता आहे सोबतीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:33 IST2025-12-10T17:33:12+5:302025-12-10T17:33:27+5:30
क्रिकेटपटू युझवेंद्र चहलबरोबरच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे आरजे महवश हे नाव देशभरात चर्चेत आलं होतं.

क्रिकेटपटूसोबत जोडलेलं नाव! आरजे महावशची थेट बॉलिवूड चित्रपटात लागली वर्णी, 'हा' अभिनेता आहे सोबतीला
Rj Mahavash New Movie: क्रिकेटपटू यजुवेंद्र चहलबरोबरच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे आरजे महवश हे नाव देशभरात चर्चेत आलं होतं. त्यानंतर आरजे महवश बऱ्याच काळापासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. आपला आवाज आणि एंटरटेन्मेंट स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली महावश ही दिल्लीची रेडिओ जॉकी आहे. सध्या आरजे महावश चर्चेत येण्यामागचं कारण वेगळंच आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतीच आरजे महावशच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
नुकताच सोशल मीडियावर आरजे महावशच्या या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. ‘टेढ़ी है पर मेरी है’ असं या नव्या चित्रपटाचं नाव आहे. ज्यामध्ये अभिनेता जितेंद्र कुमार सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता वाढली आहे. या टीझरमध्ये बॅकग्रांउडला जितेंद्र कुमारचा आवाज येत आहे. अभिनेता जितेंद्र कुमार चित्रपटात गुलाब हकीम नावाचं पात्र साकारतो आहे. तर महावशच्या भूमिकेचं नाव नगमा आहे. एकंदरीत टीझर पाहून या चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग असणार एवढं मात्र नक्की!
या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनी केले आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर रेमो डिसुझाने या चित्रपटाचा पहिला प्रोमो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत त्याने लिहिलंय," गुलाब और नगमा की मोहब्बत… एक ऐसा प्यार, जिसमें जान कम, पर जुनून ज्यादा है. गुलाब मोहब्बत में दीवाना है और नगमा कुदरत का एक अनोखा रंग....", अशा आशयाची ही पोस्ट आहे.