व्हिडीओतील ‘या’ पठ्ठयाला रितेश देशमुखने ठोकला कडक सॅल्युट, मागितला फोन नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 02:02 PM2020-01-28T14:02:41+5:302020-01-28T14:03:27+5:30

हा व्हिडीओ एकदा पाहाच...

ritesh deshmukh became emotional after watching tik tok video | व्हिडीओतील ‘या’ पठ्ठयाला रितेश देशमुखने ठोकला कडक सॅल्युट, मागितला फोन नंबर

व्हिडीओतील ‘या’ पठ्ठयाला रितेश देशमुखने ठोकला कडक सॅल्युट, मागितला फोन नंबर

googlenewsNext
ठळक मुद्दे हा व्हिडीओ बघून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट केले होते.

अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. वेगवेगळ्या मुद्यावर रितेश व्यक्त होत असतो. पण रितेशच्या ताज्या पोस्टबद्दल बोलाल तर एका जिगरबाज पठ्ठयाची कामगिरीने तो प्रचंड भारावल्याचे दिसतेय. होय, इतका की रितेशने त्याला कडक सॅल्युट ठोकला. इतकेच नाही तर नेटक-यांना त्याचा फोन नंबरही मागितला.
रितेशला इंप्रेस करणा-या या पठ्ठयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकत्याच साज-या झालेल्या प्रजासत्ताक दिनी हा व्हिडीओ टिक टॉकवर शेअर झाला आणि क्षणात व्हायरल झाला. या व्हिडीओत दोन्ही पाय नसेलला हा पठ्ठा खांबावर चढत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या खांबावर कोणताही झेंडा नाही. पण त्याच्या शरीरावर असणा-या तिरंग्यामुळे तरुण तेव्हा खांबाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा जणू काही तिरंगाच फडकत आहे असा भास होतो.


 हा व्हिडीओ बघून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट केले होते. प्रेरणा देणारा व्हिडीओ, असे महिंद्रा यांनी लिहिले होते. आता रितेश देशमुखने हा व्हिडीओ पाहून ट्विट केले आहे. ‘हा व्हिडीओ तुम्हाला प्रेरणा देत नसेल तर मग काय?  या व्यक्तीला मी सॅल्यूट करतो. कुणाकडे त्याचा मोबाईल नंबर असेल, तर मला द्यावा,’ असे रितेशने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


हा व्हिडीओ तुम्हीही पाहा आणि याबद्दल काय वाटते, ते नक्की लिहा.

Web Title: ritesh deshmukh became emotional after watching tik tok video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.