"तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही..." रितेशची लाडकी बायको जिनिलियासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:05 IST2025-02-04T16:05:18+5:302025-02-04T16:05:58+5:30

रितेशनं लाडकी बायको जिनिलियावर भरभरुन प्रेम व्यक्त केलंय.

Riteish Deshmukh Special Post For Genelia Deshmukh On 13th Wedding Anniversary | "तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही..." रितेशची लाडकी बायको जिनिलियासाठी खास पोस्ट

"तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही..." रितेशची लाडकी बायको जिनिलियासाठी खास पोस्ट

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे एक आदर्श जोडपे आहेत. या दोघांची केमेस्ट्री कमाल आहे. लग्न झाल्यानंतरही या दोघांमध्ये घट्ट मैत्रीचं नातं आहे. त्याचमुळे या दोघांची जोडी अनेकांना आवडते. दोघेही अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काल जिनिलिया आणि रितेश यांनी त्यांच्या १३ लग्नाचा वाढदिवस (Genelia Riteish 13th Wedding Anniversary) साजरा केला.  यानिमित्ताने खास पोस्ट लिहित रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रितेशनं लाडकी बायको जिनिलियावर भरभरुन प्रेम व्यक्त केलंय. पोस्ट शेअर करत त्यानं लिहलं, "१३ व्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा... बायको! ही १३ वर्षे निव्वळ जादूमय होती. आपण आपलं एक स्वतःचं सुंदर छोटंसं जग निर्माण केलं आहे. जे प्रेम, हास्य आणि साहसाने भरलेलं आहे. तू सर्वांना एकत्र जोडून ठेवतेस. मी माझ्या आयुष्याची कल्पनाही तुझ्याशिवाय करू शकत नाही. आपली जोडी एकदम भारी आहे. कायम एकत्र राहायचंय". या पोस्टबरोबर रितेशनं रोमँटिक फोटो देखील शेअर केला आहे.


रितेश आणि जिनिलिया यांची 'तुझे मेरी कसम' या पहिल्या चित्रपटादरम्यान भेट झाली.  एकत्र काम करताना दोघांची मैत्री वाढत गेली. अन् या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. रितेश आणि जिनिलियाने आपले नाते १० वर्षे लपवून ठेवले होते. या जोडप्याने २०१२ मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी, या जोडप्याने पारंपारिक महाराष्ट्रीयन समारंभात आणि दुसऱ्या दिवशी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. या जोडप्याच्या लग्नाला जवळचे कुटुंब आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. रितेश आणि जेनेलिया यांना दोन मुलगे असून त्यांची नावे रायन आणि राहिल आहेत.
 

Web Title: Riteish Deshmukh Special Post For Genelia Deshmukh On 13th Wedding Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.