रितेश देशमुख-अजय देवगणच्या 'रेड २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, बॉलिवूड अन् साऊथ इंडस्ट्रीत आहे लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:03 IST2025-04-01T14:03:32+5:302025-04-01T14:03:54+5:30

'रेड २'मध्ये सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीने २०२४ वर्ष गाजवलं आहे (raid 2)

Riteish Deshmukh Ajay Devgn raid 2 movie tamannah bhatia will be seen | रितेश देशमुख-अजय देवगणच्या 'रेड २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, बॉलिवूड अन् साऊथ इंडस्ट्रीत आहे लोकप्रिय

रितेश देशमुख-अजय देवगणच्या 'रेड २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, बॉलिवूड अन् साऊथ इंडस्ट्रीत आहे लोकप्रिय

रितेश देशमुख-अजय देवगण (ajay devgn) यांची प्रमुख भूमिका असलेला  'रेड २'सिनेमाचा (raid 2 movie) टीझर काहीच दिवसांपूर्वी भेटीला आला. अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत अजय देवगणने पुन्हा लक्ष वेधून घेतलं. पण या टीझरमध्ये खरी छाप पाडली ती रितेश देशमुखने.  'रेड २'मध्ये रितेश देशमुख (riteish deshmukh) 'दादाभाई' या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार  'रेड २'मध्ये बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

८०० कोटींचा सिनेमा देणारी अभिनेत्री  'रेड २'मध्ये

अजय देवगण-रितेश देशमुखच्या  'रेड २'मध्ये लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाची एन्ट्री झाली आहे. पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार तमन्ना भाटियाची 'रेड २'मध्ये एका खास गाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. सिनेमातील आयटम साँगसाठी तमन्ना भाटिया गायक यो यो हनी सिंग सोबत दिसणार आहे. तमन्ना आणि हनी सिंगचं गाणं एक प्रमोशनल साँग असून सिनेमाच्या शेवटी हे गाणं प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मुंबईत ३ आणि ४ मार्चला एका स्टूडियोत या गाण्याचं शूटिंग होणार आहे.

'रेड २' कधी रिलीज होणार

तमन्ना भाटियाच्या एन्ट्रीने 'रेड २'ला चार चाँद लागणार यात शंका नाही. गेल्या वर्षी 'स्त्री २' सिनेमात 'आज की रात' या गाण्यावर तमन्नाने केलेला डान्स चांगलाच गाजला. त्यामुळे 'रेड २'मध्ये तमन्नाच्या अदा पाहायला तिचे चाहते उत्सुक असतील. 'रेड २' सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे. सिनेमात अजय देवगण, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

Web Title: Riteish Deshmukh Ajay Devgn raid 2 movie tamannah bhatia will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.