'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटची EX पत्नी म्हणते, "आमचा घटस्फोट झाला असला तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:13 IST2024-12-21T11:10:19+5:302024-12-21T11:13:39+5:30

२०११ साली लग्न अन् ७ वर्षांनी घटस्फोट, रिद्धी डोगरा म्हणाली...

ridhi dogra ex wife of Raqesh Bapat says we are still good friends in spite of our divorce | 'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटची EX पत्नी म्हणते, "आमचा घटस्फोट झाला असला तरी..."

'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटची EX पत्नी म्हणते, "आमचा घटस्फोट झाला असला तरी..."

'जवान', 'द साबरमती रिपोर्ट' या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री रिद्धी डोगरा (Riddhi Dogra). रिद्धीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांवरच छाप पाडली. टीव्ही मालिका ते हिंदी सिनेमा असा यशस्वी प्रवास केला. रिद्धीचं २०११ साली अभिनेता राकेश बापटसोबत (Raqesh Bapat) लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरहीराकेश बापटसोबत मैत्री असल्याचं ती नुकतंच म्हणाली.

अभिनेता राकेश बापट सध्या 'नवरी मिळे हिटलरला' या मराठी मालिकेत 'एजे' ची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे तो मराठी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. तर दुसरीकडे रिद्धी हिंदी सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. नुकतंच पिंकव्हिला ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बापटविषयी रिद्धी म्हणाली, "सहसा मी माझ्या समस्या स्वत:जवळच ठेवते पण मला जर कोणाच्या पाठिंब्याची गरज असेल तर तेव्हा अनेक लोक  माझ्यासाठी उभे असतात. तसंच माझा भाऊ अक्षय डोगराही माझा मोठा सपोर्टर आहे. मी टेन्शनमध्ये असताना काय करायचं हे त्याला चांगलं माहित आहे. तसंच काही मित्रही आहेत ज्यांच्याकडून मी सल्ला घेते."

ती पुढे म्हणाली,"जेव्हा मला नर्व्हस वाटतं तेव्हा मी एकता कपूरकडेही जाते. माझे जुने शाळेतले मित्रही माझी साथ देतात. इतकंच नाही तर राकेश माझा ex पतीही मला पाठिंबा देतो. आमचा भलेही घटस्फोट झाला असेल पण जेव्हा मी कोणत्या समस्येत असते तेव्हा मी त्याच्याकडून सल्ला घेते. तो माझा आजही खूप जवळचा मित्र आहे."

 

Web Title: ridhi dogra ex wife of Raqesh Bapat says we are still good friends in spite of our divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.