सोनम कपूरच्या बाळाचं नाव काय आहे समजलं का? पोस्ट शेअर करत मावशीने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 14:30 IST2022-08-28T14:30:08+5:302022-08-28T14:30:53+5:30
Sonam kapoor: सोनमने लहानशा बाळाला जन्म दिल्यामुळे सध्या कपूर आणि अहुजा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

सोनम कपूरच्या बाळाचं नाव काय आहे समजलं का? पोस्ट शेअर करत मावशीने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) काही दिवसांपूर्वीच आई झाली आहे. २० ऑगस्ट रोजी सोनम कपूरने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सोनमने ही गोड बातमी शेअर केल्यापासून तिच्या चिमुकल्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. यात नुकतंच सोनमच्या बहिणीने रिहाने या बाळाचं नाव जाहीर केलं आहे.
सोनमने लहानशा बाळाला जन्म दिल्यामुळे सध्या कपूर आणि अहुजा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. यात सोनमचा डिलिव्हरीनंतर तिच्या बाळाला घरी घेऊन जातानाचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या बहिणीने या बाळाचं टोपणनावदेखील जाहीर केलं आहे.
सोनम आणि तिच्या बाळाचं घरी जंगी स्वागत करण्यात आलं. याचे काही फोटो रिहाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. या फोटोंमध्येच तिने बाळाला घरात प्रेमाने सिंबा या टोपणनावाने बोलावलं जातं असं तिने सांगितलं आहे. या स्टोरीमध्ये रिहाने 'वेलकम होम सिंबा' असं म्हटलं होतं. तेव्हापासून सोनमच्या चाहत्यांमध्ये बाळाच्या नावाविषयी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, सोनमने बाळाला जन्म दिल्यानंतर अनिल कपूर आणि आनंद आहुजा यांनी मिठाई वाटून त्यांचा आनंद व्यक्त केला.