Republic Day 2024: देशभक्तीत रंगले बॉलिवूडकर!! कलाकारांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 02:07 PM2024-01-26T14:07:52+5:302024-01-26T14:09:29+5:30

Republic Day 2024 : आज २६ जानेवारी रोजी भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलीवूड स्टार्स देशभक्तीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Republic Day 2024: Bollywood actors painted in patriotism!! Republic day greetings from artists | Republic Day 2024: देशभक्तीत रंगले बॉलिवूडकर!! कलाकारांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2024: देशभक्तीत रंगले बॉलिवूडकर!! कलाकारांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

आज २६ जानेवारी रोजी भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलीवूड स्टार्स देशभक्तीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुपम खेर
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यामध्ये देशाचे सैनिक परेड करताना दिसत आहेत.

ही पोस्ट शेअर करताना अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! हा व्हिडिओ बॉम्बे सॅपर्सच्या रिहर्सलचा व्हॉट्सॲप फॉरवर्डवरून आला आहे. या युनिटचे नेतृत्व महिला अधिकारी रुची यादव करत आहेत. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर एका सामान्य भारतीय नागरिकाचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला आहे. किती अभिमान आहे त्या आवाजात! हीच तर आजच्या भारताची शान! जय हिंद! भारत माता चिरंजीव हो।'

अक्षय कुमार
नेहमीप्रमाणे यावेळीही सच्चा देशभक्त अक्षय कुमारने सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या खास प्रसंगी अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत टायगर श्रॉफही देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये हे दोन्ही स्टार्स हातात तिरंगा घेऊन बीचवर धावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना खिलाडी कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नवीन भारत, नवा आत्मविश्वास, नवीन दृष्टी... आपला टाइम आळा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..' अक्षयची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे.

कंगना राणौत
कंगना रणौतनेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांनीही एक व्हिडिओ शेअर करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनू सूद
या खास प्रसंगी सोनू सूदने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली आहेत, ज्यात तो देशाच्या जवानांसोबत काही वेळ घालवताना दिसत आहे.

ज्युनियर एनटीआर
ज्युनियर NTR ने सर्वांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Web Title: Republic Day 2024: Bollywood actors painted in patriotism!! Republic day greetings from artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.