कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 13:03 IST2019-01-07T12:29:41+5:302019-01-07T13:03:48+5:30

वरूण धवन या वर्षी रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. आधी या सिनेमात वरूणच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार असल्याची चर्चा होती. नंतर कॅटरिनाने आपलं नावं सिनेमातून काढून घेतले.  

Remo dsouza film street dancer shraddha kapoor and nora fatehi will play lead in opposite of varun dhawan | कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी

कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी

ठळक मुद्देकॅटरिना बाहेर गेल्यानंतर या सिनेमात आता श्रद्धा कपूर आणि नोरा फतेहीची वर्णी लागल्याची चर्चा आहेया सिनेमासाठी सारा अली खानच्या नावाची देखील चर्चा होती

वरूण धवन या वर्षी रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. आधी या सिनेमात वरूणच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार असल्याची चर्चा होती. नंतर कॅटरिनाने आपलं नावं सिनेमातून काढून घेतले.  

 

 

 

 




सलमान खानच्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने कॅटने रेमो डिसूझाच्या सिनेमातून माघार घेतल्याचे कळतेय. भारतचे २० टक्के शूटींग अद्याप बाकी आहे. अशात व्यस्त वेळापत्रकामुळे कॅटला रेमोचा हा चित्रपट सोडावा लागला.  कॅटरिना बाहेर गेल्यानंतर या सिनेमात आता श्रद्धा कपूरच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. श्रद्धासोबत यात नोरा फतेही दिसणार आहे. फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार श्रद्धा कपूरसोबत नोराने ही हा सिनेमा साईन केला आहे. दोघींच्या भूमिकेबाबत अजून काही माहिती मिळू शकलेली नाही. सिनेमाचे नाव 'स्ट्रीट डान्सर' ठेवण्यात आले आहे. या सिनेमासाठी सारा अली खानच्या नावाची देखील चर्चा होती.    

सिनेमात श्रद्धा भारतीय डान्सरची भूमिका साकारणार आहे तर नोरा इंटरनॅशनल डान्सरच्या भूमिकेत दिसेल.  रेमो डिसूजा दिग्दर्शित या आगामी चित्रपटात प्रभु देवा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा सिनेमा‘एबीसीडी3’ म्हणजेच रेमोच्या ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा भाग असल्याचे मानले जात आहे. या सीरिजमधील साआधीचे दोन्ही सिनेमे रेमो डिसूजा यानेच दिग्दर्शित केले होते.  बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे.रेमोच्या या डान्स मुव्हीत आणखी काय काय एक्ससाईटींग पाहायला मिळते, ते बघूच.

Web Title: Remo dsouza film street dancer shraddha kapoor and nora fatehi will play lead in opposite of varun dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.