स्टेजवर बिग बींना मिळाला पुरस्कार अन् जया बच्चन यांना रेखाने मारली मिठी; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:29 IST2024-07-26T12:24:39+5:302024-07-26T12:29:37+5:30

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Rekha hug Jaya Bachchan After Amitabh Bachchan won Best Actor award video goes viral | स्टेजवर बिग बींना मिळाला पुरस्कार अन् जया बच्चन यांना रेखाने मारली मिठी; Video व्हायरल

स्टेजवर बिग बींना मिळाला पुरस्कार अन् जया बच्चन यांना रेखाने मारली मिठी; Video व्हायरल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचे रेखा (Rekha) यांच्याशी जोडलेले अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा आहे, जेव्हा जया व रेखा यांची एकदा पुरस्कार सोहळ्यात गळाभेट झाली होती. विशेष म्हणजे त्या भेटीचं निमित्त खुद्द अमिताभ बच्चन होते. त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सध्या सोशल मीडियावर जया व रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2016 या वर्षातील आहे. 'पिकू'सिनेमासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.  पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा अमिताभ यांना मंचावर बोलवण्यात येतं. तेव्हा रेखा आनंदाने धावत जात जया बच्चन यांना खूप प्रेमाने मिठी मारतात. जेव्हा दोघींनी एकमेकांनी मिठी मारली, तेव्हा चाहते देखील हैराण झाले. 


अमिताभ यांना मंचावर पुरस्कार स्वीकारताना पाहून दोघीही आनंदी झाल्याचं दिसून आलं. हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध कमेंट्स करत आहेत. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, आणि रेखा हे दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. सिनेइंडस्ट्रीत या तिघांबद्दल प्रचंड प्रेम, आदराची भावना आहे. या तिघांनी सिनेइंडस्ट्रीवर 70-80 च्या दशकात अधिराज्य गाजवलं. आजही हे तिन्ही कलाकार कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. 

Web Title: Rekha hug Jaya Bachchan After Amitabh Bachchan won Best Actor award video goes viral