Ratan Tata: रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार? ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:21 PM2022-11-25T12:21:45+5:302022-11-25T12:22:12+5:30

Ratan Tata Biopic : देशातील असंख्य लोकांची प्रेरणा असलेल्या याच रतन टाटांच्या प्रेरणादायी आयुष्यावर बेतलेला सिनेमा पाहायला कुणाला आवडणार नाही? चला तर तयारी सुरू झाली आहे...

Ratan Tata's biopic may be directed by National Award winner Sudha Kongara | Ratan Tata: रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार? ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

Ratan Tata: रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार? ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

googlenewsNext

Ratan Tata Biopic : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata ) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नही. आपल्या कर्तृत्वासाठीच नव्हे तर आपल्या नम्र स्वभावासाठी ते ओळखले जातात. देशातील असंख्य लोकांची प्रेरणा असलेल्या याच रतन टाटांच्या प्रेरणादायी आयुष्यावर बेतलेला सिनेमा  पाहायला कुणाला आवडणार नाही? चला तर तयारी सुरू झाली आहे.

होय, चर्चा खरी मानाल तर रतन टाटा  यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा  (Sudha Kongara) या रतन टाटा यांच्या बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहेत.  या चित्रपटासाठीचा संपूर्ण रिसर्च पूर्ण झाला आहे आणि 2023 च्या अखेरिस या सिनेमाचं शूटींग सुरू होईल, अशी आशा आहे.

 रिपोर्टनुसार, या चित्रपटात रतन टाटा यांच्या आयुष्यातील जगाला अद्यापही माहित नसलेल्या काही खास घटना, काही खास प्र्रसंग दाखवण्यात येतील. रिपोर्टनुसार, मेकर्सने स्क्रिप्टवर काम सुरू केलं आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस फोटोग्राफीचं काम सुरू होईल.


 
या अभिनेत्यांच्या नावाची चर्चा
पडद्यावर रतन टाटांची व्यक्तिरेखा कोण साकारणार? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असालच. तूर्तास नाव फायनल झालेलं नाही. पण हो, दोन अभिनेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन व साऊथ सुपरस्टार सूर्या या दोघांची नावं चर्चेत आहेत. आता यापैकी सिनेमात कोणाची वर्णी लागते? हे लवकरच कळेल.

 रतन टाटांनी 1962 मध्ये टाटा ग्रुपमधून  करिअर सुरू केलं. तेव्हा त्यांचं वय फक्त 24 होतं. पहिल्यांदा त्यांनी टाटा स्टीलच्या एका दुकानात कर्मचारी म्हणून काम केलं. जेआरडी टाटांनंतर 1991 मध्ये रतन टाटा समूहाचे पाचवे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकीर्दित टाटा ग्रुपने टेटली, जग्वार लँड रोव्हर आणि कोरससारख्या कंपन्या विकत घेतल्या.   रतन टाटा यांनी 21 वर्षांच्या करिअरमध्ये टाटा उद्योग समूहाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतल भारत सरकारने 2000 मध्ये त्यांना पद्भूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं.

Web Title: Ratan Tata's biopic may be directed by National Award winner Sudha Kongara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.