"महाराणी येसूबाई यांनी कधीच आपलं दु:ख..." काय म्हणाली रश्मिका मंदाना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:01 IST2025-01-26T15:01:35+5:302025-01-26T15:01:48+5:30

पायाला गुखापत झालेली असली तरी रश्मिका 'शो मस्ट गो ऑनट या तत्त्वावर चालताना दिसतेय. ज्यामुळे चाहते तिचं प्रचंड कौतुक करत आहेत. 

Rashmika Mandanna Share Health Update And Talk About Maharani Yesubai Bhonsale | "महाराणी येसूबाई यांनी कधीच आपलं दु:ख..." काय म्हणाली रश्मिका मंदाना?

"महाराणी येसूबाई यांनी कधीच आपलं दु:ख..." काय म्हणाली रश्मिका मंदाना?

Rashmika Mandanna Health update: रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या साऊथ इंडस्ट्रीच (South Industry) नव्हे, पण बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपला ठसा उमटवतेय. अलिकडेच, जिममध्ये व्यायाम करताना अभिनेत्रीला दुखापत (Rashmika Mandanna Accident) झाली होती. पायात फ्रॅक्चर असूनही 'छावा' (Chhaava) चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला अभिनेत्री उपस्थित राहिली. या काळात तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पायाला गुखापत झालेली असली तरी रश्मिका 'शो मस्ट गो ऑनट या तत्त्वावर चालताना दिसतेय. आता तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चाहते तिचं प्रचंड कौतुक करत आहेत. 

रश्मिकाच्या पायात ३ फ्रॅक्चर झालेत. गेल्या दोन आठवड्यांपासून ती पाय खाली ठेवू शकत नाहीये. आता रश्मिकानं तिचं हेल्थ अपडेट शेअर केलं आहे. तिनं सोशल मीडियावर 'छावा'शी संबंधित एक पोस्ट पोस्ट केली आहे आणि पायाला झालेल्या दुखापतीचा एक्स-रे रिपोर्ट शेअर केलाय. रश्मिकानं लिहलं, "सध्या मी छावाचं प्रमोशन करतेय... महाराणी येसूबाईंची भूमिका साकारताना मला खूप सन्मान, धन्यता आणि कृतज्ञता वाटतेय. महाराणी येसूबाई यांनी कधीही आपलं दुःख त्यांच्या लोकांना दाखवलं  नाही आणि मीही दाखवणार नाही. नेहमीप्रमाणे हसत राहणार". रश्मिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. 


 

'छावा' चित्रपटात रश्मिका ही विकी कौशलसोबत दिसणार आहे. विकी हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेत आहे, तर रश्मिका ही महाराणी येसूबाई यांची भुमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. रश्मिका मंदानाबद्दल बोलायचं झालं तर, अलिकडेच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' मधील श्रीवल्ली बनून अभिनेत्रीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 
 

Web Title: Rashmika Mandanna Share Health Update And Talk About Maharani Yesubai Bhonsale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.