'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:26 IST2025-11-19T18:25:15+5:302025-11-19T18:26:19+5:30
Ranvir Singh Dhurandhar : रणवीर सिंहच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
Ranvir Singh Dhurandhar : अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आणि काही तासांतच ट्रेडिंगमध्ये आले. मात्र, यूट्यूबर ध्रुव राठी याने या ट्रेलरमधील हिंस्र दृश्यांवर तीव्र आक्षेप घेत चित्रपटाची तुलना ISIS च्या क्रूर व्हिडिओंशी केली. त्याने दिग्दर्शक आदित्य धर याच्यावरही पैशांसाठी लालची झाल्याची थेट टीका केली.
आदित्य धरचा महत्वकांशी धुरंधर चित्रपट येत्या 5 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये या सर्वांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ट्रेलरमध्ये रक्तपातासह अनेक अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत. मात्र, युट्यूबर ध्रुव राठीने यातील हिंसाचारावर तीव्र शब्दात टीका केली.

ध्रुव राठीने X (ट्विटर) वर लिहिले की, “आदित्य धर याने बॉलीवुडमधील नीचतेची हद्द ओलांडली आहे. ‘धुरंधर’च्या ट्रेलरमध्ये इतका हिंसाचार, रक्तपात आणि टॉर्चर आहे की, ते पाहणं म्हणजे ISIS च्या शिरच्छेद करण्याऱ्या व्हिडिओसारखे वाटत आहे. तुम्ही याला एंटरटेनमेंट म्हणता? आदित्य धर पैशांचा लालची आहे. तरुणांच्या मेंदूत या प्रकारचे विष भरले जात आहे. तरुणांना हिंसाचाराबद्दल असंवेदनशील केले जात आहे. सेंसर बोर्डला आता ठरवावे लागेल की, त्यांना खरंच कोणत्या गोष्टीची जास्त चिंता आहे. लोकांच्या किसिंग सीनची की, जिवंत माणसाची कातडी सोलण्याची?” अशा शब्दात राठीने टीका केली.