६०० कोटींच्या सिनेमातून रणवीर आऊट, आता साऊथच्या दोन सुपरस्टार्सच्या नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 15:17 IST2023-04-16T15:11:48+5:302023-04-16T15:17:46+5:30
Ranveer Singh : बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे देणारा रणवीर सिंग सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, अलीकडे आलेले रणवीरचे सर्व सिनेमे दणकून आपटलेत. अशात आता हातातले सिनेमेही गमावायची वेळ रणवीरवर आली आहे.

६०० कोटींच्या सिनेमातून रणवीर आऊट, आता साऊथच्या दोन सुपरस्टार्सच्या नावाची चर्चा
बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे देणारा रणवीर सिंग सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, अलीकडे आलेले रणवीरचे सर्व सिनेमे दणकून आपटलेत. अशात आता हातातले सिनेमेही गमावायची वेळ रणवीरवर आली आहे. चर्चा खरी मानाल 'द इमोर्टल अश्वत्थामा' (The Immortal Ashwatthama) हा सिनेमा रणवीरने हातचा गमावला आहे.
'द इमोर्टल अश्वत्थामा'मधून विकी कौशल आऊट झाल्यानंतर या सिनेमात रणवीरची एन्ट्री झाल्याची चर्चा होती. पण ताज्या चर्चेनुसार, रणवीर या सिनेमातून बाहेर झाला आहे. आता या सिनेमासाठी दोन सुपरस्टार्सच्या नावावर चर्चा सुरू झाल्याचं कळतंय. 'द इमोर्टल अश्वत्थामा' या सिनेमात ज्युनिअर एनटीआर आणि अल्लू अर्जुन या दोन साऊथ सुपरस्टार्सला घेण्याचा विचार मेकर्स करत आहेत. सगळं काही ठीक राहिलं तर यापैकी एका सुपरस्टारचं नाव या प्रोजेक्टसाठी फायनल होऊ शकतं.
याचवर्षी जानेवारी महिन्यात विकी कौशल 'द इमोर्टल अश्वत्थामा'मधून (The immortal ashwatthama ) बाहेर झाल्याची बातमी आली होती. पाठोपाठ निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपटातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतल्याने हा चित्रपट रखडण्याच्या मार्गावर होता, मात्र यानंतर जिओने हा सिनेमा पुढे नेण्याचा निर्धार केला. या सिनेमासाठी तब्बल ६०० कोटींचा बजेट ठरवण्यात आला.
अल्लू अर्जुन की ज्युनियर एनटीआर?
या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची बातमी गेले काही दिवस सर्वत्र चर्चेत होती. पण आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार रणवीर देखील या चित्रपटातून बाहेर पडला असल्याचं बोललं जात आहे आणि आता या चित्रपटासाठी साऊथच्या कलाकारांच्या नावाची चर्चा आहे. अल्लू अर्जुन व ज्युनिअर एनटीआर यांच्यापैकी एकाला घेण्याचा विचार मेकर्स करत आहे. केवळ इतकंच नाही या साऊथ स्टार्सच्या अपोझिट सामंथा रूथ प्रभुच्या नावाची चर्चा सुरू आहे. अर्थात अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.