गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:08 IST2024-05-20T14:07:14+5:302024-05-20T14:08:09+5:30
दीपिकाची बदललेली चाल पाहून चाहत्यांना वाटली चिंता

गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
आज देशभरात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सामान्यांसह सेलिब्रिटीही आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. हिंदी सिनेविश्वातील सर्वात चर्चेतील कपल रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. हे दोघंही लवकरच आईबाबा होणार असल्यानेही चर्चेत आहेत. दरम्यान मतदानासाठी आलेले असताना पहिल्यांदाच दीपिका पदुकोणचा बेबीबंप चाहत्यांना दिसला. यामुळे सोशल मीडियावर दीपिकाच्या बेबीबंपचीच चर्चा सुरु झाली आहे.
रणवीर आणि दीपिका सकाळी ११ नंतर बांद्रा येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले. आलिशान कारमधून दोघंही केंद्राबाहेर दाखल झाले. यावेळी दोघांनी ट्विनिंग आऊटफिट परिधान केले होते. पांढरा शर्ट, ब्लू जीन्स आणि डोळ्यावर गॉगल असा दोघांचाही लूक होता. आधी रणवीर सिंह कारमधून उतरला. नंतर त्याने दीपिकाच्या बाजूचं दार उघडलं आणि तिचा हात पडकला. दीपिका हळूच कारमधून बाहेर आली. यावेळी तिची चालही बदललेली दिसली. तेव्हाच तिचा बेबी बंप दिसला. दीपिकाने थोडा लूझ शर्ट घातला होता. तरी तिचा बेबी बंप लपला नाही तर नेटकऱ्यांच्या नजरेत आलाच. दोघांची झळक पाहण्यासाठी लोकांची आणि पापाराझींची गर्दी झाली. तेव्हा रणवीर पत्नीला गर्दीतून सांभाळताना दिसला.
रणवीर दीपिकाची किती काळजी घेतोय हे पाहून चाहतेही सुखावले. त्यांनी रणवीरचं कौतुक केलं. तसंच दीपिका सरोगसीच्या माध्यमातून आई होणार अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला. कारण आज अखेर तिचा बेबी बंप दिसून आला. मात्र दीपिका चालताना थोडी अनकंफर्टेबल दिसली यामुळे चाहत्यांना तिच्या तब्येतीची चिंता वाटत आहे. दीपिका सप्टेंबरमध्ये पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या ती पाच महिन्यांची गरोदर आहे.