कचरा उचलताच रणवीर सिंग झाला ट्रोल, नेटकरी म्हणाले, 'देशातला सगळा कचरा...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 17:20 IST2023-03-21T17:20:01+5:302023-03-21T17:20:33+5:30
रणवीरने कचरा उचलला तरी त्याला नेटकरी ट्रोलच करत आहेत.

कचरा उचलताच रणवीर सिंग झाला ट्रोल, नेटकरी म्हणाले, 'देशातला सगळा कचरा...'
आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असणार अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आता वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो कडेला असलेला कचरा उचलताना दिसतोय. रणवीरने कचरा उचलला तरी त्याला नेटकरी ट्रोलच करत आहेत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. रणवीर सिंग काल मुंबईत एका सलुनच्या उद्घाटनाला पोहोचला होता. यावेळी त्याचा लुक तसा साधाच होता. काळ्या रंगाचा टीशर्ट आणि राखाडी रंगाची पॅंट त्याने परिधान केली होती. जसा तो ग्रीन कार्पेटवर आला त्याला बाजूला काहीतरी कचरा दिसला. तो लगेच खाली वाकला आणि त्याने कचरा उचलला.
रणवीरच्या या व्हिडिओवर चाहतेही लगेच कमेंट करायला लागले. 'भारतातील रस्त्यावर खूप कचरा आहे. तो कधी उचलला गेला नाही. कॅमेरे आहेत म्हणून हा स्टंट करत आहे.' अशी कमेंट एकाने केली आहे. तर 'ओव्हरअॅक्टिंगचे ५० रुपये कापले पाहिजे' अशी कमेंट एका युझरने केली आहे.