दीपिकासाठी रणवीरने सोडलं होतं 'धुरंधर'चं शुटिंग?; अभिनेत्याने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:57 IST2026-04-01T08:57:30+5:302026-04-01T08:57:58+5:30
Ranveer singh: या सिनेमात रणवीरने साकारलेल्या हमजा या भूमिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत.

दीपिकासाठी रणवीरने सोडलं होतं 'धुरंधर'चं शुटिंग?; अभिनेत्याने केला खुलासा
बॉलिवूडचा पॉवरफूल अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. या सिनेमाने रिलीज झाल्यावर अवघ्या दोन दिवसांमध्येच अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमात रणवीरने साकारलेल्या हमजा या भूमिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. विशेष म्हणजे धुरंधरमुळे गाजत असलेल्या रणवीरने दिपिकासाठी या सिनेमाचं चित्रीकरणमध्येच सोडलं होतं. नुकताच या गोष्टीचा खुलासा त्याच्या सहकलाकाराने केला आहे.
रणवीरसह या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे अभय अरोरा. या सिनेमात अभयने यासिर ही भूमिका साकारली आहे. अलिकडेच अभयने मिर्ची प्लसला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने धुरंधरविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
ज्यावेळी धुरंधरचं चित्रीकरण सुरु होतं त्यावेळी अभिनेत्री दिपिका पादुकोण प्रेग्नंट होती. त्यामुळे या दिवसांमध्ये तिला वेळ देणं रणवीरसाठी फार गरजेचं होतं. परंतु, व्यस्त शेड्यूलमुळे त्याला हे सगळं जमवणं फार कठीण जात होतं. मात्र, त्यातूनही तो मार्ग काढत होता.
दिपिकासाठी रणवीर अर्ध्यावर सोडायचा चित्रीकरण
''प्रेग्नंसी काळात दिपिकाची काळजी घेणं, तिला वेळ देणं यासाठी रणवीर पुरेपूर प्रयत्न करायचा. तिच्या देखभालीमध्ये तो कोणतीही कसर बाकी ठेवत नव्हता. सिनेमाचं शेड्यूल बिझी असल्यामुळे त्याला दिपिका फार वेळ देता येत नव्हता. मात्र, जेव्हा शक्य होईल त्यावेळी तो शुटिंग सोडून ३ ते ४ दिवसांची सुट्टी घेऊन दिपिकाला वेळ द्यायचा'', असं अभयने सांगितलं.
पुढे तो म्हणतो, ''रणवीर त्याच्या कुटुंबाची प्रचंड काळजी घेतो''. त्याने कायम त्याच्या कुटुंबाला टॉप प्रायोरिटी दिली आहे. दरम्यान, दिपिका आणि रणवीरन २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दिपिकाने २०२४ मध्ये त्यांच्या लाडक्या लेकीला दुवा जन्म दिला. दुवा तिच्या क्युटनेसमुळे कायमच चर्चेत असते.