विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ला पछाडलं! जगभरात 'या' भारतीय सिनेमाची क्रेझ, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:10 IST2026-03-07T13:38:00+5:302026-03-07T14:10:29+5:30

नेटफ्लिक्सवर सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला भारतीय सिनेमा  सिनेमा, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग, तुम्ही बघितला?

ranveer singh starrer dhurandhar movie became most watched indian film on netflix trending on ott | विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ला पछाडलं! जगभरात 'या' भारतीय सिनेमाची क्रेझ, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग

विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ला पछाडलं! जगभरात 'या' भारतीय सिनेमाची क्रेझ, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग

Dhurandhar: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा २०२५ मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. रणवीर सिंहचा हा स़्पाय अॅक्शन थ्रिलर सिनेमा ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येकाच्या ओठांवर या चित्रपटाचं नाव आहे.  धुरंधरने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर अवघ्या चार आठवड्यातच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला. दरम्यान, ओटीटीवर प्रदर्शित होताच रणवीरच्या या सिनेमाने मोठ-मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. हा चित्रपट फक्त भारतातच नाहीतर परदेशातही टॉप १० चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

बॉक्स ऑफिसवर धुरंधर या चित्रपटाने १,३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. नुकताच धुरंधर २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा रंगली आहे.रणवीर सिंगच्या "धुरंधर" या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर रेकॉर्ड केला आहे. ३० जानेवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अवघ्या ३१ दिवसांत २.२ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यावरून धुरंधर हा ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट ठरला आहे. रणवीरच्या दमदार अभिनयाने आणि चित्रपटाच्या आकर्षक कथेने प्रेक्षकांना भुरळ घातली असून हा सिनेमाने  डिजीटल प्लॅटफॉर्मवर नंबर स्थान पक्कं केलं आहे.

'धुरंधर'ने गेल्या पाच आठवड्यांपासून नेटफ्लिक्सच्या टॉप १० यादीत सातत्याने आपले स्थान कायम ठेवले आहे. जागतिक स्तरावर, या चित्रपटाने "नॉन-इंग्रजी" चित्रपटांच्या श्रेणीमध्येही आपला दबदबा कायम ठेवला आहे. २३ फेब्रुवारी ते १ मार्च या आठवड्यात, तो जगभरात नवव्या क्रमांकावर होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी ही कामगिरी करणं ही एक महत्त्वाची बाब आहे. ‘धुरंधर’ने विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ या चित्रपटालाही पछाडलं आहे.

Web Title : रणवीर सिंह की 'धुरंधर' का वैश्विक दबदबा, विजय सेतुपति की 'महाराजा' को पछाड़ा।

Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर' एक ब्लॉकबस्टर बनी, जिसने ₹1,300 करोड़ से अधिक की कमाई की। ओटीटी पर रिलीज़ होने के बाद, इसे 31 दिनों में 2.2 करोड़ व्यूज मिले, जो कई फिल्मों से अधिक हैं। इसने लगातार नेटफ्लिक्स के टॉप 10 में स्थान बनाए रखा, यहां तक कि विश्व स्तर पर, विजय सेतुपति की 'महाराजा' से भी बेहतर प्रदर्शन किया।

Web Title : Ranveer Singh's 'Dhurandhar' Dominates Globally, Outshines Vijay Sethupathi's 'Maharaja'.

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar' became a blockbuster, earning over ₹1,300 crore. Released on OTT, it gained 2.2 crore views in 31 days, surpassing many films. It consistently ranked in Netflix's Top 10, even globally, outperforming Vijay Sethupathi’s ‘Maharaja’.