दीपिकापेक्षा रणवीर सिंगला 'ही' गोष्ट आहे जास्त प्रिय, खुलासा करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:12 IST2024-05-10T13:11:28+5:302024-05-10T13:12:09+5:30

बाॅलिवूडमधील सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे.

Ranveer Singh Shows Off His Wedding Ring After Sensationally Deleting Pics With Deepika Padukone | दीपिकापेक्षा रणवीर सिंगला 'ही' गोष्ट आहे जास्त प्रिय, खुलासा करत म्हणाला...

दीपिकापेक्षा रणवीर सिंगला 'ही' गोष्ट आहे जास्त प्रिय, खुलासा करत म्हणाला...

बाॅलिवूडमधील सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघेही एकमेंकावरील प्रेम कायम व्यक्त करत असतात. पण, तुम्हाला माहितेय रणवीर सिंगकडे अशी एक गोष्ट आहे, जी त्याला खूप प्रिय आहे. याचा खुलासा त्याने नुकताच एका मुलाखतीमध्ये केला आहे. 

रणवीर सिंगने नुकतेच एका ज्वेलरी ब्रँडच्या शोरूमच्या उद्घाटन केलं. यावेळी तो म्हणाला, 'माझ्या आवडत्या अंगठ्यांपैकी एक माझ्या लग्नाची अंगठी आहे, जी मला माझ्या पत्नीने भेट दिली होती. दुसरी प्लॅटिनम एंगेजमेंट रिंग आहे.  याशिवाय आईचे हिऱ्याचे झुमके आणि आजीचे मोत्यांचे दागिने हेदेखील आवडते दागिने आहेत'. 

विशेष म्हणजे रणवीर-दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहे. दीपिका पादुकोण ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर  त्याच्याकडे २०२४ आणि २०२५ मध्ये अनेक मोठे चित्रपट आहेत. रणवीर पुढच्या वर्षी फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन 3 चे शूटिंग सुरू करणार आहे. याशिवाय तो आदित्य धरचा अनामित ॲक्शन चित्रपटही करत आहे. यासोबत रणवीर सिंग सिंघम अगेनमध्येही झळकणार आहे. 


 

Web Title: Ranveer Singh Shows Off His Wedding Ring After Sensationally Deleting Pics With Deepika Padukone