रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 16:56 IST2023-12-07T16:52:09+5:302023-12-07T16:56:52+5:30

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बी टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे.

Ranveer Singh Praises Deepika Padukone | रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...'

रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...'

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बी टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे. ऑनस्क्रीनबरोबर त्यांच्या ऑफस्क्रिन जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. नुकतचं रणवीरने सौदी अरेबियात आयोजित रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने दीपिकाचे तोंडभरून कौतुक केले. 

रणवीर सिंग म्हणाला,  'दीपिका माझी शिक्षिका आहे. ती माझ्यापेक्षा मोठी कलाकार आहे. पण तिने तिचं स्टारडम घरात आणले नाही. आजही मी तिच्याकडून अभिनयातील बारकावे शिकतो. मी खूप भाग्यवान आहे, कारण मला दीपिकासारखी पत्नी मिळाली'.

पुढे रणवीर म्हणाला, 'जीवनात नेहमीच चढ-उतार असतात. चित्रपट हिट असो वा फ्लॉप याने काही फरक पडत नाही. माझा पहिला चित्रपट 'बँड बाजा बारात' 2010 मध्ये रिलीज झाला आणि तो हिट झाला, तेव्हा मी रातोरात स्टार झालो. 72 तासात माझे जग बदलले होते'. तर करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रॉकी रंधावाची भुमिका साकारणे एक आव्हान होते, असेही तो म्हणाला. 

रणवीर आणि दीपिकाने 2018 साली लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. हा लग्नसोहळा मोजके कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला होता. त्यानंतर दोघांनी मुंबईत रिसेप्शनही दिलं होतं. 

Web Title: Ranveer Singh Praises Deepika Padukone