आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेताना रणवीर सिंग भावुक; नात जनाईची भेट घेऊन केलं सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:14 IST2026-04-13T17:10:57+5:302026-04-13T17:14:08+5:30
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगही आशाताईंचं अंतिम दर्शन घेताना भावुक झालेला दिसला.

आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेताना रणवीर सिंग भावुक; नात जनाईची भेट घेऊन केलं सांत्वन
आशा भोसले यांचं काल १२ एप्रिलला निधन झालं. आशा भोसले यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. आशाताईंच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सर्वजण त्यांना धीर द्यायला पुढे आले. राजकीय व्यक्तींपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आशा भोसले यांचं आज अंतिम दर्शन घेतलं. अशातच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगही आशाताईंचं अंतिम दर्शन घेताना भावुक झालेला दिसला.
रणवीरने आशाताईंच्या नातीला दिला धीर
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दुपारी आशाताईंच्या निवासस्थानी त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचला. त्यावेळी रणवीरने शांतपणे हात जोडून आशाताईंच्या पार्थिवाला नमस्कार केला. रणवीरही काहीसा भावुक झालेला दिसत होता. पुढे रणवीर जात होता इतक्यात काहीसा मागे वळला. त्याने आशाताईंची नात जनाईची आवर्जुन भेट दिली. रणवीरला पाहताच जनाईचाही बांध फुटला. रणवीरने तिला मिठी मारुन तिच्या पाठीवर हात ठेवला आणि धीर दिला. अशाप्रकारे रणवीरही भावुक झालेला दिसला.
पुढे आशाताईंंचं अंतिम दर्शन घेऊन गाडीकडे जात असताना रणवीरचे डोळे पाणावलेले होते. एकूणच लाडक्या गायिकेच्या शेवटच्या क्षणांसाठी वेळात वेळ काढून रणवीर हजर होता. आशाताईंचं पार्थिव आता दादर स्मशानभूमीत आणलं असून काही वेळांतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशाताईंच्या अंतिम दर्शनासाठी आलेले त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक, कलाकार आणि राजकारणी सर्वजण भावुक झाले आहेत.