Deepika Padukone Current Laga Re Song: दीपिकाचं ‘करंट लगा रे’, गाण्याचा टीझर पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:25 IST2022-12-07T15:24:31+5:302022-12-07T15:25:27+5:30
Deepika Padukone Current Laga Re Song: दीपिकानं गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या गाण्यात दीपिका भलतीच सुंदर दिसते आहे.

Deepika Padukone Current Laga Re Song: दीपिकाचं ‘करंट लगा रे’, गाण्याचा टीझर पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone ) हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. लवकरच ‘पठान’ या सिनेमात ती शाहरूखसोबत झकळणार आहे. पण त्याआधी रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) तिला पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
होय, पती रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ (Cirkus) या आगामी चित्रपटात दीपिका कॅमिओ रोलमध्ये आहे. या सिनेमात दोघांवर ‘करंट लगा रे’ (Current Laga Re Song) हे गाणं चित्रीत केलं आहे. उद्या 8 डिसेंबरला हे गाणं रिलीज होतंय. पण त्याआधी या गाण्याची एक छोटीशी झलक समोर आली आहे आणि या गाण्यानं चाहत्यांना जणू वेड लावलं आहे. दीपिकाचं नवं गाणं व्हायरल झालं असून त्याला सोशल मीडियावर याच गाण्याची चर्चा आहे.
‘सर्कस’मध्ये दीपिका ‘करंट लगा रे’ गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आज त्याचा टीझर व्हायरल झाला आहे. दीपिकानं देखील तिच्या सोशल मीडियावरुन त्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या गाण्यात दीपिका भलतीच सुंदर दिसते आहे. तिच्या डान्स मुव्ह्स वेड लावणाऱ्या आहेत. शिवाय दीर्घ काळानंतर दीपिका व रणवीर ही जोडी एकत्र पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’मध्ये रणवीर लीड रोलमध्ये आहे. याशिवाय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरूण शर्मा अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा एक कॉमेडी सिनेमा आहे. यात रणवीर डबल रोलमध्ये दिसणार आहे. याच महिन्यात 23 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.