अंबानींच्या घरी रणवीर-दीपिकाने साजरा केला गणेशोत्सव , अभिनेत्याचा नवा लूक सर्वजण पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:36 IST2025-08-28T15:36:14+5:302025-08-28T15:36:36+5:30

Ambani House Ganesh Celebration: मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी रणवीर-दीपिकाने हजेरी लावली. त्यावेळी रणवीरचा नवा लूक सर्वजण पाहतच राहिले

Ranveer Singh Deepika Padukone celebrate ganesh chatruthi at mukesh ambani home | अंबानींच्या घरी रणवीर-दीपिकाने साजरा केला गणेशोत्सव , अभिनेत्याचा नवा लूक सर्वजण पाहतच राहिले

अंबानींच्या घरी रणवीर-दीपिकाने साजरा केला गणेशोत्सव , अभिनेत्याचा नवा लूक सर्वजण पाहतच राहिले

सर्वत्र गणेशोत्सवाचं उत्साहाचं वातावरण दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत. विविध मंडळांना बॉलिवूडचे सेलिब्रिटी भेट देत आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खास पूजा केली. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी 'अँटिलिया' येथे आयोजित केलेल्या वार्षिक गणेश पूजेमध्ये हे दोघे सहभागी झाले होते.

रणवीरचा लूक बदलला

यावेळी रणवीर सिंग एका नव्या लूकमध्ये दिसला. गेले अनेक दिवस आगामी धुरंधर सिनेमाचं प्रमोशन आणि शूटिंगनिमित्त रणवीरने दाढी आणि केस वाढवले होते. पण यावेळी मात्र त्याने आपली दाढी आणि केस कापलेले दिसले, ज्यामुळे त्याचा लूक खूप बदललेला दिसत होता. रणवीर अनेक दिवसांनी क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसत असल्याने चाहत्यांनी रणवीरच्या लूकचं कौतुक केलं. रणवीरने बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेला दिसला. रणवीर कुटुंबासाठी बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना करतोय, हे पाहायला मिळालं.


मुलीच्या जन्मानंतर पहिली गणेश चतुर्थी

रणवीर आणि दीपिकासाठी ही गणेश चतुर्थी खूप खास आहे, कारण त्यांच्या मुलगी दुआच्या जन्मानंतरचा हा त्यांचा पहिला गणेशोत्सव आहे. रणवीर सिंगने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘आपल्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे आणि तो आता आपल्या पत्नी आणि मुलीसोबत अधिक वेळ घालवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.’ या कपलने त्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर पहिला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रणवीर-दीपिका खूप उत्सुक आहेत, यात शंका नाही.

Web Title: Ranveer Singh Deepika Padukone celebrate ganesh chatruthi at mukesh ambani home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.