रणवीर सिंग निघाला कॉपी मास्टर, चक्क जान्हवी कपूरचाच लूक केला कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 06:00 AM2019-03-28T06:00:00+5:302019-03-28T06:00:00+5:30

खरंतर रणवीर सिंग लग्नानंतर त्याच्या फॅशन स्टेटमेंटमुळे जास्त चर्चेत राहिला. वेगवेगळे हटके स्टाइल करत तो पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळतो.

Ranveer Singh Copy Janhvi kapoors Purple Sweat shirt And Wears It | रणवीर सिंग निघाला कॉपी मास्टर, चक्क जान्हवी कपूरचाच लूक केला कॉपी

रणवीर सिंग निघाला कॉपी मास्टर, चक्क जान्हवी कपूरचाच लूक केला कॉपी

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंग आपल्या हटके आणि भन्नाट स्टाइलमुळे लाखो तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यामुळे  स्टाइल आयकॉन म्हणूनही त्याची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

 

रणवीरच्या फॅशन स्टाइलबाबत बोलायचे झाले तर तो नेहमी वेगवेगळ्या एक्सपरिमेंट्स करताना दिसतो. खरंतर रणवीर सिंग लग्नानंतर त्याच्या फॅशन स्टेटमेंटमुळे जास्त चर्चेत राहिला. वेगवेगळे हटके स्टाइल करत तो पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळतो.

सध्या त्याच्या सिनेमापेक्षा त्याची ड्रेसिंग स्टाइलच जास्त लक्षवेधी ठरत आहे. पुन्हा एकदा रणवीरचा एक लूक व्हायरल झाला आहे. स्पोर्टी स्वेट शर्टमध्ये रणवीर सिंग कॅमे-यात कॅप्चर झाला आहे.  त्याचे हे फोटो व्हायरल होताच नेटीझन्सने मात्र त्याला यावेळी टार्गेट केल्याचे पाहायला मिळतंय. सोशल मीडियावरही चाहत्यांना रणवीरचा हा लूक फारसा आवडलेला दिसत नाही.  या फोटोत त्याने स्वेट - टी शर्ट घातल्याचे दिसतंय. काही दिवसांपूर्वी असाच स्वेट-शर्ट घालून जान्हवी कपूरही फिरताना दिसली होती.

जान्हवी कपूरच्या टीशर्ट सारखाच हा शर्ट पाहायला मिळतो. त्यामुळे आता रणवीर सिंहने चक्क जान्हवी कपूरची  कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतरख्या ८-९ वर्षांत रणवीरने स्वत:ला सिद्ध केले आणि एकापेक्षा एक सरस भूमिका वठवत, बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.

Web Title: Ranveer Singh Copy Janhvi kapoors Purple Sweat shirt And Wears It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.