"आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही", लेकीच्या घटस्फोटानंतर काय म्हणालेले रणधीर कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:28 IST2025-06-13T15:27:39+5:302025-06-13T15:28:14+5:30

"अखखी दिल्ली ओळखून आहे की तो...", रणधीर कपूर यांनी काढलेला राग

randhir kapoor once reacted on daughter karisma kapoor s ex husband sunjay kapur | "आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही", लेकीच्या घटस्फोटानंतर काय म्हणालेले रणधीर कपूर?

"आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही", लेकीच्या घटस्फोटानंतर काय म्हणालेले रणधीर कपूर?

अभिनेत्री करिष्मा कपूरचा (Karisma Kapoor) पूर्व पती बिझनेसमन संजय कपूर यांचं(Sunjay Kapoor)  काल निधन झालं. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. २००३ साली संजय कपूर आणि करिष्मा यांचं लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मात्र काही वर्षांनी २०१६ साली त्यांचा घटस्फोट झाला. करिष्माने संजय आणि त्याच्या कुटुंबियांवर छळाचा आरोप केला होता. संजय यांच्यावर तिने अनेक गंभीर आरोप केले होते. तेव्हा प्रकरण खूप चर्चेत होतं. करिष्माचे वडील रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनीही तेव्हा प्रतिक्रिया दिली होती.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर म्हणालेले की, "आम्हाला सगळेच ओळखून आहेत. आम्ही कपूर आहोत. आम्हाला पैशांसाठी कोणाच्या मागे धावण्याची गरज नाही. आम्हाला केवळ संपत्तीचाच आशीर्वाद नाही तर आमचं टॅलेंटही आम्हाला आयुष्यभर पुरु शकतं."

ते पुढे म्हणालेले की, "संजय एक थर्ड क्लास माणूस आहे. करिष्माशी त्याचं लग्न व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. त्याच्या सिस्टममध्येच अय्याशी आहे. त्याने कधीच त्याच्या पत्नीची काळजी घेतली नाही. तो उलट तिचा विश्वासघात करत होता आणि परस्त्रीसोबत राहत होता. तो कसा आहे हे पूर्ण दिल्लीसला ठाऊक आहे. मी यापेक्षा अजून काही बोलणार नाही."

संजय कपूरच्या यांच्या पहिल्या पत्नीचं नाव नंदिता महतानी आहे. २००३ साली त्यांचा घटस्फोट झाला होता. तर २०१३ साली संजय कपूर यांचा करिष्माशी घटस्फोट झाला. त्यांना समायरा आणि कियान हे दोन मुलं आहेत. नंतर २०१७ साली त्यांनी प्रिया सचदेवसोबत लग्नगाठ बांधली. २०१८ साली त्यांना एक मुलगा झाला.  

Web Title: randhir kapoor once reacted on daughter karisma kapoor s ex husband sunjay kapur