Sourav Ganguly च्या चेंडूंवर Ranbir Kapoor चे तुफानी षटकार; ईडन गार्डन्सवर झाला सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:36 IST2023-02-27T13:34:52+5:302023-02-27T13:36:28+5:30
Ranbir Kapoor Sourav Ganguly : अभिनेता रणबीर कपूर आणि क्रिकेटचा दादा सौरव गांगुली यांच्यात कोलकातात क्रिकेटचा सामना झाला.

Sourav Ganguly च्या चेंडूंवर Ranbir Kapoor चे तुफानी षटकार; ईडन गार्डन्सवर झाला सामना
Ranbir Kapoor Sourav Ganguly : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याचा आगामी 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर काल कोलकाता येथे आला होता. यावेळी त्याने प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) सोबत मैत्रीपूर्ण सामना खेळला. यावेळी रणबीरने गांगुलीच्या चेंडूवर तुफान फटकेबाजी केली. रेव्हस्पोर्ट्सने या सामन्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
रणबीरच्या संघाचे नाव 'मक्कार इलेव्हन' तर गांगुलीच्या संघाचे नाव 'झुठी इलेव्हन' असे होते. दोन्ही संघ मैदानात भिडले. यावेळी हा सामना पाहण्यासाठी मैदानात भरपूर चाहतेही आले होते. सामन्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. यावेळी रणबीरने चाहत्यांची निराशा केली. रणबीर कपूरने सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करत नसल्याचे स्पष्ट केले. अलीकडेच अशा बातम्या समोर आल्या होत्या की, रणबीर सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करत आहे.
रणबीरकडून गांगुलीचे कौतुक
यावेळी रणबीरने दादाचे तोंडभरुन कौतुकही केले. रणबीर म्हणाला, “दादा एक लिव्हिंग लेजंड आहेत. ते फक्त भारतातच नाही तर जगभरात लेजंड म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्यावर बनवलेला बायोपिक खूप खास असेल. दुर्दैवाने मला हा चित्रपट ऑफर झालेला नाही, त्यामुळे मी त्याचा भाग नसेल. मला वाटतं की, मेकर्स 'लव फिल्म्स' अजूनही या चित्रपटाची कथा लिहित आहेत.'
किशोर कुमारांच्या बायोपिकमध्ये
यादरम्यान रणबीर कपूरने किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये काम केल्याची बातमी दिली. तो म्हणाला, 'मी 11 वर्षांपासून किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम करत आहे. मी अनुराग बासूसोबत या चित्रपटाचे लेखन करत आहे. मला आशा आहे की हा माझा पुढचा बायोपिक असेल. पण दादाच्या बायोपिकबद्दल मला काही माहिती नाही.'
रणबीरचा आगामी चित्रपट
रणबीर कपूरचा 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपट येत्या 8 मार्चला चित्रपटगृहात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजनने केले आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर आणि श्रद्धा कपूरची जोडी एकत्र दिसणार आहे. रणबीरचा शेवटचा रिलीज झालेला ब्रह्मास्त्र सुपरहिट ठरला होता.