रणबीर कपूरची हिरोईन बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात करणार लग्न, रोका सेरेमनीचे सुंदर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:18 IST2025-01-28T13:17:35+5:302025-01-28T13:18:39+5:30

रणबीर कपूरसोबत अभिनय करुन बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे

Ranbir Kapoor rocket singh heroine shazahn padmasee will get married roka ceremony | रणबीर कपूरची हिरोईन बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात करणार लग्न, रोका सेरेमनीचे सुंदर फोटो व्हायरल

रणबीर कपूरची हिरोईन बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात करणार लग्न, रोका सेरेमनीचे सुंदर फोटो व्हायरल

सध्या लग्नसराईचा मौसम सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. मराठी मनोरंजन विश्वात शिवानी सोनार, तेजश्री जाधव या अभिनेत्रींनी नुकतंच लग्न केलं. अशातच आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्रीचं नाव शाजान पदमसी. शाजान लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार असून तिच्या रोका सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

शाजान लवकरच करणार लग्न

आपल्या सर्वांना माहित असेलच की, शाजानने रणबीर कपूरसोबत 'रॉकेट सिंग' सिनेमात अभिनय केलेला. या सिनेमातील शाजानची भूमिका चांगलीच गाजली. आता नुकतेच सोशल मीडियावर शाजानचे रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल झालेत. शाजान या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय. कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत शाजानची ही रोका सेरेमनी पार पडली. शाजान लवकरच तिचा बॉयफ्रेंड आशिष कनकियासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.


शाजानचा नवरा काय करतो?

शाजानचा होणारा नवरा आशिष कनकिया हा कनकिया ग्रुपचा डिरेक्टर आणि मूव्ही मॅक्स सिनेमाज कंपनीचा सीईओ आहे. शाजान ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. काही मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. २००९ साली तिने 'रॉकेट सिंग' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिने रणवीर सिंगबरोबर स्क्रीन शेअर केली होती. 'दिल तो बच्चा है जी' या सिनेमात ती अजय देवगणबरोबर दिसली होती. 'मसाला', 'हाऊसफूल २', 'ऑरेंज', 'पागलपन', 'सॉलिड पॅटेल्स' या सिनेमांमध्येही तिने काम केलंय. 
 

Web Title: Ranbir Kapoor rocket singh heroine shazahn padmasee will get married roka ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.