रणबीर कपूर पोहोचला सलमान खानच्या घरी? १० वर्षांपूर्वीचं भांडण अखेर मिटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:53 PM2024-04-12T13:53:46+5:302024-04-12T13:54:30+5:30

रणबीर कपूरच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' सिनेमात सलमान खाननेही कॅमिओ केला होता.

Ranbir Kapoor reached at Salman Khan s house along with Alia Bhatt fans couldnt keep calm | रणबीर कपूर पोहोचला सलमान खानच्या घरी? १० वर्षांपूर्वीचं भांडण अखेर मिटलं

रणबीर कपूर पोहोचला सलमान खानच्या घरी? १० वर्षांपूर्वीचं भांडण अखेर मिटलं

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या आगामी 'रामायण' सिनेमामुळे चर्चेत आहे. तसंच Animal च्या यशानंतर त्याचा भावही वधारला आहे. नुकतंच रणबीर आणि आलियाचा एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो सलमान खानच्या (Salman Khan) गॅलक्सी मधला असल्याचं समजतंय. सलमानच्या घरी रणबीर-आलियाला आलेलं बघून चाहत्यांच्याही आनंदाला पारावर उरलेला नाही. रणबीर आणि सलमानचं जुनं भांडण आता मिटल्याची ही चिन्ह आहेत.

रणबीर कपूरच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' सिनेमात सलमान खाननेही कॅमिओ केला होता. या सिनेमाच्या शूटदरम्यानच रणबीर आणि कतरिना प्रेमात पडले होते. त्यांच्या अफेअरमुळे सलमान खान रणबीरवर नाराज होता. दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. नंतरही सलमान आणि रणबीर असे दोघं सोबत क्वचितच दिसले असतील. पण आता त्यांच्यातील हे १० वर्षांपासूनचं भांडणं मिटल्याची शक्यता आहे. कारण रणबीरचा आलियासोबत सलमानच्या घरातील फोटो व्हायरल झाला आहे. सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटमधील हा फोटो आहे.Reddit प्लॅटफॉर्मवरुन हा फोटो व्हायरल झाला आहे. 

सध्या रमजानचा महिना सुरु असल्याने ईदसाठीच रणबीर-आलिया सलमानच्या घरी गेल्याचा काहींनी अंदाज लावला आहे. तर काही जणांनी सलमान-रणबीर एकत्र सिनेमा करणार का? अशाही कमेंट केल्या आहेत. सलमान खानने काल ईदनिमित्त 'सिकंदर' सिनेमाची घोषणा केली. पुढच्या वर्षी ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. तर रणबीर कपूर 'रामायण','अॅनिमल पार्क','ब्रम्हास्त्र २' सह काही सिनेमांमध्ये दिसणार आहे. तसंच रणबीर आलिया आणि विकी कौशलचा 'लव्ह अँड वॉर' हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित सिनेमाही रिलीज होणार आहे.

Web Title: Ranbir Kapoor reached at Salman Khan s house along with Alia Bhatt fans couldnt keep calm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.