बाबो! आलिया भटशी लग्न केल्यानंतर धमाका करणार रणबीर कपूर, फीमेल फॅन्सना देणार खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 01:35 PM2022-04-14T13:35:28+5:302022-04-14T14:33:20+5:30

आलिया भट आणि रणबीर कपूर गुरुवारी (आज) सात फेरे घेणार आहेत. लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत.

Ranbir kapoor alia bhatt wedding today watch couple cute love bonding on stage | बाबो! आलिया भटशी लग्न केल्यानंतर धमाका करणार रणबीर कपूर, फीमेल फॅन्सना देणार खास गिफ्ट

बाबो! आलिया भटशी लग्न केल्यानंतर धमाका करणार रणबीर कपूर, फीमेल फॅन्सना देणार खास गिफ्ट

googlenewsNext

आलिया भट आणि रणबीर कपूर गुरुवारी (आज) सात फेरे घेणार आहेत. लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. मेहंदीच्या फंक्शननंतर, रणबीरची आई नीतू कपूर यांनी लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. 14 एप्रिल रोजी दोघेही वास्तूमध्ये सात फेरे घेणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  रणबीर कपूरने सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे पण त्याची भावी पत्नी आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा रणबीरसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. रिपोर्टनुसार रणबीर कपूर लवकरच सोशल मीडियावर दाखल होणार आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरचे सोशल मीडियापासून फारकाळ दूर राहणार नाही. आलियाने रणबीरला लग्नानंतर सोशल मीडियावर येण्यास तयार केले आहे. रिपोर्टनुसार रणबीर चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक खास संदेश शेअर करणार आहे. जर हे खरं असेल तर फॅन्स नक्कीच खूश होतील. 

नीतू कपूर भावुक 
काल रणबीर व आलियाच्या मेहंदी सेरेमनीनंतर रणबीरची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धीमा कपूर पापराझींसमोर आले. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सनी त्यांना आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख नेमकी काय आहे? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना नीतू कपूर यांनी फक्त ‘उद्या’ असं उत्तर दिलं. तरीही अनेकांचा विश्वास बसेना. नीतू आताही मस्करी करतेय असं सर्वांना वाटलं. त्यामुळे अनेकांनी कधी? असा पुन्हा प्रश्न केला. यावर ‘अरे लग्न उद्या आहे,’ असं उत्तर त्यांनी दिलं.

होणारी सूनबाई कशी आहे? असा प्रश्न त्यांना केला असता, ‘मी तिच्याबद्दल काय बोलू, ती बेस्ट आहे,’असं त्या म्हणाल्या. नणंदबार्इंनी सुद्धा आलियाचं कौतुक केलं. ‘ती फारच क्यूट आहे’, असं आलियाची होणारी नणंद रिद्धीमा म्हणाली. रिपोर्टनुसार, मेहंदी सेरेमनीत नीतू यांनी ऋषी कपूर यांचे काही किस्से शेअर केलेत. यावेळी त्या भावुक झाल्यात.
 

Web Title: Ranbir kapoor alia bhatt wedding today watch couple cute love bonding on stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.