Ranbir Alia Wedding: महेश भट्ट यांच्या मेहंदीची चर्चा; 'या' दोन खास व्यक्तींची हातावर लिहिलं नावं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 14:47 IST2022-04-15T14:46:52+5:302022-04-15T14:47:28+5:30
Ranbir Alia Wedding: या लग्नसोहळ्यात महेश भट्ट अत्यंक साध्या लूकमध्ये दिसून आले. मात्र, त्यांनी हातावर काढलेली मेहंदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती.

Ranbir Alia Wedding: महेश भट्ट यांच्या मेहंदीची चर्चा; 'या' दोन खास व्यक्तींची हातावर लिहिलं नावं
बॉलिवूडमधील क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी अखेर लग्नबंधनात बांधली गेली आहे. १४ एप्रिल रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्न केलं. विशेष म्हणजे हे लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर सातत्याने रणबीर- आलिया ही जोडी ट्रेंड होत आहे. इतंक नाही तर या लग्नातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यातच आता आलियाचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
अनेकदा वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत येणारे महेश भट्ट यावेळी आलिया-रणबीरच्या लग्नामुळे चर्चेत येत आहेत. या लग्नसोहळ्यात महेश भट्ट अत्यंक साध्या लूकमध्ये दिसून आले. मात्र, त्यांनी हातावर काढलेली मेहंदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती.
लग्नापूर्वी आलियाचा मेहंदी सोहळा रंगला. यावेळी रणबीर-आलियाच्या घरातील सगळ्या सदस्यांनी शगून म्हणून हातावर मेहंदी काढली. यात महेश भट्ट यांनीही त्यांच्या दोन्ही हातांवर मेहंदी काढली.
का आहे महेश भट्ट यांची मेहंदी खास?
महेश भट्ट यांनी त्यांच्या हातावर आलिया आणि रणबीर या जोडीचं नाव काढलं आहे. कन्यादान करत असताना त्यांच्या मेहंदीचे काही फोटो व्हायरल झाले. ज्यात या नवविवाहित जोडीची नाव लिहिल्याचं दिसून येत आहे.