हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:15 IST2025-05-30T17:14:57+5:302025-05-30T17:15:42+5:30

वजन वाढू न दिण्यासाठी आणि पडद्यावर फिट अँड फाईन दिसण्यासाठी बॉलिवूड अभिनेता एक सोप्पी गोष्ट करतो. ही स्टेप फॉलो करुन तुमचंही वजन राहील नियंत्रणात

ramleela movie actor gulshan devaiah share diet and fitness mantra of weight loss | हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय

हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय

बॉलिवूड कलाकार स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. स्क्रीनवर चांगलं दिसण्यासाठी हे कलाकार प्रचंड मेहनत करताना दिसतात. बॉलिवूडमधील अशाच एका कलाकाराने स्वतःला फिट अँड फाइन ठेवण्यासाठी एक खास गोष्ट करते. ज्यांना बारीक राहायचंय आणि फिट अँड फाईन राहायचंय ती माणसं ही गोष्ट जरुर करु शकतात. हा कलाकार आहे रामलीला, हंटर फेम गुलशन देवैया. गुलशनने एका मुलाखतीत त्याचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे.

गुलशनचा फिटनेस मंत्रा

न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखती गुलशनने त्याच्या डाएटबद्दल सर्वांना सांगितलंय. गुलशन फिट राहण्यासाठी आणि वजन कंट्रोल करण्यासाठी दिवसातून फक्त एकदाच जेवतो.  दिवसातून फक्त एकदाच जेवणं हे खूप आव्हानात्मक आहे. गुलशन म्हणाला, मी दिवसातून एकदाच खातो. हे रोज होत नाही परंतु जेवढं शक्य होईल तेवढं मी या गोष्टीत सातत्य ठेवायचा प्रयत्न करतो. ३६५ दिवसांमध्ये मी ३०० दिवसांमध्ये मी दिवसातून फक्त एकदाच जेवायचा प्रयत्न करतो. 


२०१८ पासून मी हा नियम स्वतःला लावला आहे. अनेकदा आपण जास्त खातो त्यामुळे समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन वाढतं आणि शारीरिक समस्या निर्माण होतात. जास्त खाण्याने वजन नियंत्रणात ठेवणं आणि हवा तसा लूक ठेवणं मला कठीण वाटत होतं. त्यामुळे वन मील डाएट अर्थात दिवसातून एकदाच जेवणं मी पसंत करतो. यामुळे मी हवे ते पदार्थही खाऊ शकतो. पण हव्या त्या गोष्टी एकदाच खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, असा खुलासा गुलशनने केलाय.

Web Title: ramleela movie actor gulshan devaiah share diet and fitness mantra of weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.