Ramayana Movie:प्रदर्शनापूर्वीच मिळालेली ७०० कोटींची डील नाकारली, ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांचा काय आहे प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:21 IST2026-04-04T13:17:56+5:302026-04-04T13:21:01+5:30
प्रदर्शनापूर्वीच रामायणच्या ओटीटी डीलची चर्चा! कोट्यवधींची मिळालेली ऑफर निर्मात्यांनी धुडकावली, काय आहे कारण?

Ramayana Movie:प्रदर्शनापूर्वीच मिळालेली ७०० कोटींची डील नाकारली, ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांचा काय आहे प्लॅन?
Ramayana Movie:रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'रामायण'हा सिनेमा येत्या काही महिन्यांतच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच काळापासून प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. मात्र,अलिकडेच, हनुमान जयंतीनिमित्त रामायण सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. नितीश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यासह चित्रपटात साई पल्लवी, सनी देओल, रवी दुबे तसंच साउथ स्टार यश यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. एकीकडे चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांचेच डोळे लागले असताना पडद्यमागे अनेक घडामोडी आणि व्यवहारांना सुरुवात झाल्याचं लक्षात येत आहे.आता सिनेमाच्या ओटीटी डीलबद्दल एक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सुमारे ४००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच एका OTT प्लॅटफॉर्मकडून मोठी ऑफर मिळाल्याचं बोललं जातंय.बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार,रामायण सिनेमाला एका ओटीटी प्लॅटफॉर्मकडून जवळपास ७०० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. मात्र, नमित मल्होत्रा यांनी ही ऑफर नाकारल्याची माहिती मिळते आहे. ही ऑफर कोणाकडून आली होती याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
का नाकारली ऑफर?
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे मेकर्स ७०० कोटींच्या ऑफरवर समाधानी नसून रामायणच्या दोन्ही भागांच्या बजेटचा विचार करता निर्माते सुमारे १००० कोटींची OTT डील करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच उर्वरित रक्कम त्यांनी वर्ल्डवाइड थिएटर रिलीज आणि इतर स्त्रोतांमधून वसूल करण्याची योजना आखली असल्याची अफडेट मिळतेय.थोडक्यात 'रामायण'ला १००० कोटी रुपयांचा ओटीटी प्रस्ताव अगदी सहजपणे मिळेल हा विश्वास आहे, ज्यामुळे त्यांनी 700 कोटींची ऑफर नाकारली.