उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:46 IST2025-12-05T17:45:46+5:302025-12-05T17:46:18+5:30
उर्मिलासोबत जास्त सिनेमे का केले? राम गोपाल वर्मा म्हणाले...

उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सिनेसृ्ष्टीच्या इतिहासात अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांच्या सिनेमात काम करणारे नंतर मोठे स्टार झाले. 'सत्या','रंगीला','भूत','सरकार','कौन' अशा कित्येक सिनेमांचा समावेश आहे. त्यांच्याच सिनेमामुळे उर्मिला मातोंडकर हे नाव चर्चेत आलं. 'भूत', 'कौन', 'सत्या', 'रंगीला' या सिनेमांमुळे तिला ओळख मिळाली. यामुळे उर्मिलासोबत त्यांचं अफेअर असल्याचीही चर्चा झाली. आता त्यावर राम गोपाल वर्मा यांनी मौन सोडलं आहे.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरसोबतच्या लिंक अपच्या चर्चांवर राम गोपाल वर्मा म्हणाले, " उर्मिलासोबत बरेच सिनेमे केले याचं कारण तिच्यात क्षमता होती. 'हाय रामा' गाणं शूट करताना मी तिच्या परफॉर्मन्सची तीव्रता पाहिली. ती चांगली दिसते, आकर्षक बॉडी आहे पण या गाण्यावेळी तिने जे हावभाव दिले ते अद्भूत होते. तिच्या अभिनय कौशल्यानेच मी प्रभावित झालो होतो. नंतर सत्या मध्येही तिची गर्ल नेक्स्ट डोर इमेज बनली. तिच्या कामात वैविध्य होतं जे मला इतर कोणामध्ये दिसलं नाही. म्हणूनच मी तिच्यासोबत इतके सिनेमे केले. लोक बोलतातच आणि जे ऐकतात त्यावर विश्वास ठेवतात. मी उर्मिलापेक्षा जास्त सिनेमे तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले आहेत. त्याविषयी कोणी बोलत नाही."
उर्मिला मातोंडकरने इतके हिट सिनेमे दिले मात्र कायम तिच्या लूक्स आणि वैयक्तिक आयुष्याचीच जास्त चर्चा झाली. यावर उर्मिला मागे एका मुलाखतीत म्हणालेली की, "इंडस्ट्रीत कायम एक आयटम गर्ल किंवा सेक्स सायरन म्हणून माझ्याकडे बघितलं जायचं. मी आऊटसायडर होते आणि याचे परिणाम मला भोगावे लागले. नेपोटिझममुळेच माझं करिअर बर्बाद झालं. राम गोपाल वर्मांसोबत माझं कोणतंही भांडण नाही. मी त्यांच्या 'कंपनी','राम गोपाल वर्मा की आग' या सिनेमांमध्ये स्पेशल साँगही केलं."