“लग्न कधी करणार?”, चाहत्याच्या प्रश्नावर रकुल प्रीत सिंगनं दिलं भन्नाट उत्तर, वाचून तुम्हालाही हसू येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:41 IST2024-07-04T12:41:01+5:302024-07-04T12:41:48+5:30

लग्नावरून प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्याला तिने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Rakul Preet Singh's reply to fan who asked when she will get married Rakul replied, "Kitni baar karaoge"? | “लग्न कधी करणार?”, चाहत्याच्या प्रश्नावर रकुल प्रीत सिंगनं दिलं भन्नाट उत्तर, वाचून तुम्हालाही हसू येईल!

“लग्न कधी करणार?”, चाहत्याच्या प्रश्नावर रकुल प्रीत सिंगनं दिलं भन्नाट उत्तर, वाचून तुम्हालाही हसू येईल!

रकुलचं नाव हे बॉवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. आतापर्यंत ती अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कुल प्रीत सिंह सध्या तिच्या आगामी 'इंडियन 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या रकुल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना पाहायला मिळत आहे. तिच्या कामाबरोबर तिचा वैयक्तिक आयुष्यामुळे ती चांगलीच चर्चेत असते. तर आता लग्नावरून प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्याला तिने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

नुकतंच रकुलनं इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' हे सेशल घेतलं. यावेळी एका चाहत्याने तिला लग्नाबद्दल प्रश्न केला. यावर रकुलने मजेशीर उत्तर दिलं. रकुलला एका चाहत्याने  "मॅडम, तुमच्या लग्नाचे काय प्लॅन आहेत?" हा प्रश्न केला. यावर हा प्रश्न वाचून रकुलही क्षणभर चकित झाली.  तिनं आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांला उत्तर दिलं. तिनं लिहलं, 'झालं भाऊ! किती वेळा करायला लावणार?'. यासोबत तिनं हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. 

रकुलने फेब्रुवारीमध्ये गोव्यात बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत मोठ्या थाटामाटात लग्न केलं. गोव्यात या जोडप्याच्या लग्नाचे फंक्शन तीन दिवस चालले होते. सोशल मीडियावरही या शाही लग्न सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते.या जोडप्याने दोन रितीरिवाजानुसार लग्न केलं होतं. पहिल्यादा त्यांनी सिंधी परंपरेनुसार आणि दुसऱ्यांदा शीख परंपरेनुसार लग्न केलं होतं. 

रकुल ही लवकरच 'इंडियन 2' सिनेमात झळकणार आहे. येत्या 12 जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रकुल ही अभिनेता कमल हसन यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री लवकरच 'दे दे प्यार दे 2'  आणि 'मेरी पत्नी का रीमेक' मधून प्रेभकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरही दिसणार आहेत.
 

Web Title: Rakul Preet Singh's reply to fan who asked when she will get married Rakul replied, "Kitni baar karaoge"?