पार्टनरने चीट केलं तर माफ करावं का? आयुषमानचं उत्तर ऐकून रकुल प्रीत सिंह शॉक; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 13:49 IST2026-05-20T13:48:53+5:302026-05-20T13:49:49+5:30

विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणावर काय म्हणाले आयुषमान खुराना, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान?

rakul preet singh shocked on ayushmann khurana s answer on cheating in relationship | पार्टनरने चीट केलं तर माफ करावं का? आयुषमानचं उत्तर ऐकून रकुल प्रीत सिंह शॉक; म्हणाली...

पार्टनरने चीट केलं तर माफ करावं का? आयुषमानचं उत्तर ऐकून रकुल प्रीत सिंह शॉक; म्हणाली...

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या 'पती पत्नी और वो दो' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिच्यासोबत आयुष्मान खुराना, सारा अली खान, वामिका गब्बी यांच्या भूमिका आहेत. नावाप्रमाणेच सिनेमात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यात आले आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त आयुषमान खुराना, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान यांनी विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. एकदा चूक झालीच तर माफ केली जाऊ शकते असं आयुषमान म्हणाला ज्यावर रकुल शॉक झाली. यावर तिने काय उत्तर दिलं वाचा. 

'पती पत्नी औ वो दो'च्या प्रमोशनवेळी कलाकारांना नात्यातील चीटिंगच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रकुल म्हणाली, "रिलेशनशिपमध्ये चीटिंगला वावच नसतो.' यावर सारा अली खान म्हणते, 'समोरच्याने कमीत कमी माफी तरी मागायला हवी, पण चीटिंग करणं हे चुकीचंच आहे'. आयुष्मानने यावेळी जरा वेगळा दृष्टिकोन मांडला. तो म्हणाला, 'लग्न केल्यानंतर त्या दोघांनी ठरवलेले काही नियम असतात. जर कोणी खरोखर मनापासून माफी मागितली तर त्याला का नाही माफ करायचं?' यावर रकुल आयुषमानला विचारते, 'चीटिंग करुन?' तर तो म्हणतो, "माणसांकडून चुका होत असतात आणि त्या चुका वास्तविकही असू शकतात."

यानंतर साराने रकुलला एकदा धोका देणं ठीक आहे का? असं विचारलं. तेव्हा रकुल म्हणाली, "मला तरी हे अजिबात योग्य वाटत नाही. आयुष्य खूप मोठं आहे. जर कोणाकडून एकदा चूक झाली आणि त्याला त्याचा पश्चाताप असेल तरच माफ करणं ठीक आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला माफ करता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट विसरावीही लागते. हे सगळं मी आपण जनरल चर्चा करतोय म्हणूनच बोलतीये. याचा माझ्या वैवाहिक आयुष्याशी काहीही संबंध नाही."

Web Title : रिश्ते में धोखा? आयुष्मान के जवाब से रकुल हैरान, माफी पर सवाल।

Web Summary : रकुल प्रीत सिंह, आयुष्मान खुराना और सारा अली खान ने फिल्म प्रमोशन के दौरान बेवफाई पर चर्चा की। आयुष्मान ने पश्चाताप के बाद माफी का सुझाव दिया, जिससे रकुल हैरान रह गईं, जिनका मानना है कि धोखा अस्वीकार्य है। सारा ने माफी की आवश्यकता पर जोर दिया, लेकिन रकुल अपनी बात पर कायम रहीं।

Web Title : Cheat in relationship? Rakul shocked by Ayushmann's answer on forgiveness.

Web Summary : Rakul Preet Singh, Ayushmann Khurrana, and Sara Ali Khan discussed infidelity during a film promotion. Ayushmann suggested forgiveness after genuine remorse, shocking Rakul, who believes cheating is unacceptable. Sara emphasized the need for an apology, but Rakul maintained her stance against infidelity, even if mistakes happen.