कंडोमचं पॅके़ट फाडून अभिनेत्री बनली 'छत्रीवाली', सोशल मीडियावर फोटोमुळे धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 06:36 PM2021-11-13T18:36:24+5:302021-11-13T18:37:11+5:30

अभिनेत्री रकुल प्रीत (Rakul Preet Singh) ने नुकताच तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. तिच्या हातात एक मोठं कंडोमचं पॅकेट दिसत आहे

Rakul Preet Singh shared a picture of condom by presenting her movie first look | कंडोमचं पॅके़ट फाडून अभिनेत्री बनली 'छत्रीवाली', सोशल मीडियावर फोटोमुळे धुमाकूळ

कंडोमचं पॅके़ट फाडून अभिनेत्री बनली 'छत्रीवाली', सोशल मीडियावर फोटोमुळे धुमाकूळ

googlenewsNext

बॉलिवूड विश्वात आता कलाकार एकाच पठडीतले सिनेमे वेगळ्या विषयांवरील सिनेमेही करू लागले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या काही समस्यांवर मेन स्ट्रीमधील कलाकार काम करत आहेत. नुकतीच एका अभिनेत्रीच्या तिच्या नव्या सिनेमाची शूटींग सुरू केली. त्यावेळी तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर धमाका झाला आहे. 

अभिनेत्री रकुल प्रीत (Rakul Preet Singh) ने नुकताच तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. तिच्या हातात एक मोठं कंडोमचं पॅकेट दिसत आहे. ज्यावर लिहिलंय 'छत्रीवाली' (Chhatriwali). हा फोटो शेअऱ करत अभिनेत्रीने लिहिलं की,  'बिन मौसम बरसात कभी भी हो सकती है, अपनी छतरी तैयार रखिए. सादर करत आहोत 'छतरीवाली' का पहला लुक.'

रकुल प्रीतसोबतच सुमित व्यास, सतीश कौशिक, राजेश तेलंग, प्राची शाह आणि रिवा अरोरा या सिनेमात महत्वाच्या भूमिका करणार आहेत. 'छत्रीवाली' सिनेमाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहे. या सिनेमाचं शूटींग नुकतंच लखनौमध्ये सुरू झालं. या सिनेमाशिवाय रकुल लवकरच अटॅक, मेडे, डॉक्टर जी आणि थॅंक गॉड सारखे सिनेमे येणार आहेत. 

रकुल प्रीत सिंहने तिच्या वाढदिवसाला फॅन्सना आश्चर्याचा धक्का देणारी बातमी दिली होती. रकुल प्रीत सिंह तिच्या प्रेमाबाबत खुलासा केला होता. तिने इन्स्टाग्रामवरून सांगितलं होतं की, ती अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी याला डेट करत आहे. 
 

Web Title: Rakul Preet Singh shared a picture of condom by presenting her movie first look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.