अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा, ‘Raksha Bandhan’च्या पोस्टरवर दिसलेल्या ‘त्या’ चौघी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:39 IST2022-06-21T16:49:44+5:302022-06-21T19:39:29+5:30
Akshay Kumar upcoming Movie Raksha Bandhan : बॅक टू बॅक सिनेमे देणाऱ्या अक्षयचा आणखी एक सिनेमा येतोय. या सिनेमाचं नाव आहे, ‘रक्षाबंधन’. हा फॅमिली ड्रामा आहे.

अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा, ‘Raksha Bandhan’च्या पोस्टरवर दिसलेल्या ‘त्या’ चौघी कोण?
Akshay Kumar upcoming Movie Raksha Bandhan : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा (Akshay Kumar ) ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा फ्लॉप झाला. पाठोपाठ अलीकडे रिलीज झालेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा सिनेमाही आपटला. आता अक्षयचा आणखी एक सिनेमा येतोय. या सिनेमाचं नाव आहे, ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan). हा फॅमिली ड्रामा आहे आणि यात भूमी पेडणेकर अक्षयच्या अपोझिट दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात अक्षयच्या चार ऑनस्क्रीन बहिणीही आहेत. होय, अक्षयच्या याच चार ऑनस्क्रीन बहिणींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सादिया खतीब
अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमात सादिया खतीब अक्षयची बहिण बनली आहे. सादिया ही अभिनेत्री आहे. विधु विनोद चोप्रांच्या ‘शिकारा’ या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला होता. इन्स्टाग्रामवर तिचे 18.4 फॉलोअर्स आहेत.
शाहजमीन कौर
शाहजमीन कौर हिनेही ‘रक्षाबंधन’मध्ये अक्षयच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. हा तिचा पहिला सिनेमा आहे. या चित्रपटाद्वारे तिचा डेब्यू होणार असल्याचं कळतंय. तिला डान्स, सिंगींग आणि अॅक्टिंगची आवड आहे.
दीपिका खन्ना
दीपिका खन्ना ही सुद्धा ‘रक्षाबंधन’मध्ये अक्षयची बहिण बनली आहे. मुंबईची दीपिका अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. तिला आधीपासूनच अभिनेत्री बनायचं होतं. ‘रक्षाबंधन’च्या निमित्ताने तिला मोठा ब्रेक मिळाला आहे.
स्मृती श्रीकांत
अक्षयच्या चार बहिणींमध्ये स्मृती श्रीकांत ही सुद्धा एक आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. फिटनेस फ्रिक स्मृती अभिनेत्री आहेच शिवाय मॉडेलही आहे. आता अक्षयच्या सिनेमातून तिचा डेब्यू होतोय.