Box Office Collection Day 1 : आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’नं केली निराशा, पहिल्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:18 AM2022-08-12T10:18:26+5:302022-08-12T10:22:56+5:30

Box Office Collection Day 1 : ‘लाल सिंग चड्ढा’च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत आणि हे आकडे निराशाजनक आहेत..., वाचा, अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ची कमाई

raksha bandhan AND Laal Singh Chaddha box office collection Day 1 | Box Office Collection Day 1 : आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’नं केली निराशा, पहिल्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी!

Box Office Collection Day 1 : आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’नं केली निराशा, पहिल्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी!

googlenewsNext

Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर वापसी केली आहे. त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा सिनेमा काल रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर देशभर प्रदर्शित झाला. या सिनेमाकडून आमिरचा बऱ्याच अपेक्षा होत्या. साहजिकच पहिल्या दिवशी या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हा सिनेमा किती कमाई करतो, हे पाहण्यास आमिरसह सगळेच उत्सुक होते. तर पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत आणि हे आकडे आमिरचा सिनेमा म्हटल्यावर निराशाजनक आहेत.

आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. सोशल मीडियावरही चाहत्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. कदाचित याचा ‘लाल सिंग चड्ढा’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईवर परिणाम झाला. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने 10 ते 11 कोटीच्या दरम्यान कमाई केली. फायनल कलेक्शनचा आकडा अद्याप यायचा आहे. पण तो 12 कोटीच्या घरात असेल, असे जाणकार सांगत आहेत. 2022 मधील चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनच्या तुलनेत हा आकडा ठीकठाक वाटत असला तरी आमिरचा सिनेमा म्हटल्यानंतर हा आकडा फार काही समाधानकारक नाही.

रक्षाबंधन’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ( Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) एकाच दिवशी रिलीज झालेत. या दोन्ही चित्रपटांचा क्लॅश यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारच्या सिनेमाची खास बात म्हणजे, त्याच्या सिनेमाची कथा रक्षाबंधनावर आधारित आहे. कथेत इमोशन आहेत, फॅमिली आहे आणि शिवाय अक्षय कुमार आहे. पण या चित्रपटानेही अपेक्षेइतका गल्ला जमवला आहे.

प्राथमिक आकडेवारीनुसार, अक्षयच्या या सिनेमाने पहिल्या दिवशी 9 कोटींच्या जवळपास कमाई केली. हा आकडा अक्षयच्या ‘बच्चन पांडे’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ या यावर्षीच्या दोन फ्लॉप सिनेमाच्या ओपनिंग डे कलेक्शनपेक्षाही कमी आहे. पण ‘रक्षाबंधन’चा बजेट कमी आहे. त्यातुलनेत ही कमाई ठीकठाक आहे.
अर्थात ‘रक्षाबंधन’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ या दोन्ही सिनेमांना मोठा वीकेंड मिळाला आहे. त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे येत्या 3 दिवसांची कमाई या चित्रपटांचं बॉक्स ऑफिसवरचं नशीब ठरवणार आहे.

Web Title: raksha bandhan AND Laal Singh Chaddha box office collection Day 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.