Rajpal Yadav: दिग्दर्शनाची हौस भारी पडली! राजपाल यादवचा 'तो' चित्रपट तुम्ही पाहिलाय का? 'या' प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:30 IST2026-02-10T16:24:31+5:302026-02-10T16:30:38+5:30

राजपाल यादवचा तो चित्रपट; तुम्ही पाहिलाय का? 'या' प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध 

rajpal yadav in trouble because of his directorial debut movie ata pata laapata where to watch  | Rajpal Yadav: दिग्दर्शनाची हौस भारी पडली! राजपाल यादवचा 'तो' चित्रपट तुम्ही पाहिलाय का? 'या' प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध 

Rajpal Yadav: दिग्दर्शनाची हौस भारी पडली! राजपाल यादवचा 'तो' चित्रपट तुम्ही पाहिलाय का? 'या' प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध 

Rajpal Yadav Cinema: आपले विनोदी कौशल्य आणि कॉमेक टायमिंगने प्रेक्षकांचा खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे राजपाल यादव.सध्या हा अभिनेता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २०१० मधील चेक बाऊन्स प्रकरणी हा अभिनेता स्वत:दिल्लीतील तुरूंगामध्ये स्वत: सरेंडर झाला आहे. जवळपास १५ वर्षांपूर्वी एक चित्रपट बनवण्यासाठी राजपाल यादवने हे कर्ज घेतलं होतं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे अभिनेत्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं.याप्रकरणी आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. परंतु, तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का? जर नसेल पाहिला तर हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता जाणून घ्या...

राजपाल यादवच्या या चित्रपटाचं नाव अता पता लापता (Ata Pata Laapata) असं आहे. हा एक विनोदी आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा सिनेमा आहे.हा चित्रपट बनवण्यासाठी राजपाल यादवने ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. त्याने ७५ लाख रुपये जमा केले पण उर्वरित रक्कम तो परत करू शकला नाही.

दरम्यान, या चित्रपटात सुरुवातीला माधव चतुर्वेदी नावाचा व्यक्ती त्याच्या घरात चोरी झाल्याची पोलिसात तक्रार दाखल  करतो. सुरुवातीला हे प्रकरण साधं घरफोडीचं असल्याचे दिसतं, परंतु तपास जसजसा पुढे सरकतो तसतसे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या तपासादरम्यान, पोलिसांना संशय येऊ लागतो की ही चोरी लोकांच्या विम्याचे पैसे मिळविण्यासाठी रचलेला कट असावा. त्यानंतर मीडियाच्या हस्तक्षेपामुळे हे 
प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनतं. बातम्यांमुळे पोलिसांवर आणखी दबाव वाढते. मग कथेत एकामागोमाग एक ट्विस्ट येत जातात आणि कथेला एक नवीन वळण लागते.

हा चित्रपट राजपाल यादव यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संजय कुमार, संदीप नाथ आणि राजपाल यांनी लेखन केलं आहे. चित्रपटात विनोद आचार्य, आशुतोष राणा, शरत सक्सेना, गोविंद नामदेव, गोवर्धन असरानी, ​​अमित बहल, कृष्णा भट्ट, विक्रम गोखले, पंकज झा आणि युसूफ हुसेन, मनोज जोशी, मुस्ताक खान, रझाक खान, यशपाल शर्मा, विजय राज, चेतन पांडे, पंडित पंडे या कलाकारांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला. ११ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने फक्त ३४ लाख रुपयांचा व्यवसाय केला होता.  राजपाल यादवचा हा सिनेमा युट्यूबवर तुम्ही पाहू शकता. 

Web Title : राजपाल यादव का निर्देशन असफल; यूट्यूब पर देखें!

Web Summary : राजपाल यादव 'अता पता लापता' के निर्माण के लिए लिए गए ऋण के कारण जेल में हैं, जो असफल रही। बीमा धोखाधड़ी से जुड़ी यह फिल्म यूट्यूब पर उपलब्ध है। यादव ने निर्देशन और अभिनय किया; फिल्म ने ₹11 करोड़ के बजट के मुकाबले ₹34 लाख कमाए।

Web Title : Rajpal Yadav's directorial debut flopped; watch it on YouTube!

Web Summary : Rajpal Yadav faces jail for a loan taken to produce 'Ata Pata Laapata,' which flopped. The film, a political satire involving insurance fraud, is available on YouTube. Yadav directed and starred alongside other actors; it grossed ₹34 lakhs against a ₹11 crore budget.