"मला रिकामं बसवू नका, काम द्या..."; तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवने केलं भावुक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:28 IST2026-02-18T13:22:58+5:302026-02-18T13:28:03+5:30
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राजपाल यादवला फसवणुकीच्या एका प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने आता चित्रपटसृष्टीकडे कामासाठी मदतीचा हात मागितला आहे

"मला रिकामं बसवू नका, काम द्या..."; तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवने केलं भावुक आवाहन
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राजपाल यादवला फसवणुकीच्या एका प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने आता चित्रपटसृष्टीकडे कामासाठी मदतीचा हात मागितला आहे. याशिवाय तो या संपूर्ण प्रकरणावर स्वतःची बाजू मांडण्यासाठी लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. काय म्हणाला राजपाल?
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राजपाल यादवने मनोरंजन सृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शकांना आवाहन केले आहे. तो म्हणाला, "मी चित्रपटसृष्टीला विनंती करतो की मला पुन्हा काम द्या. मला काम करण्याची खूप इच्छा आहे. पैशांबाबत बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार मला मानधन द्या, ते मला मान्य असेल. पण कृपया मला रिकामं घरी बसवू नका, मला कामाची गरज आहे."
VIDEO | After HC suspends sentence in cheque bounce cases, Actor Rajpal Yadav says, "All legal matters are before the High Court. As the case is sub judice, I do not wish to comment and I fully respect the court's decisions. Within the next few days, we will hold a press… pic.twitter.com/uZZvICXEcy
— Press Trust of India (@PTI_News) February 18, 2026
याशिवाय ज्यांनी ज्यांनी राजपालला मदत केली त्यांचेही अभिनेत्याने आभार मानले. तो म्हणाला, "प्रत्येक व्यक्तीच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. ज्यांनी सोशल मीडियावर मला साथ दिली, त्या सर्वांचे मी आभार मानतो; आणि ज्यांनी माझ्यावर टीका केली किंवा माझ्याबद्दल वाईट बोलले, त्यांचेही मी आभार मानतो." राजपालने पुढे असंही म्हटलं की, "जे लोक ऑनलाइन सक्रिय नाहीत, पण मनातून माझ्यासाठी प्रार्थना करतात आणि मला शुभेच्छा देतात, त्यांच्याबद्दलही मी तितकाच कृतज्ञ आहे."
नेमकं प्रकरण काय होतं?
राजपाल यादवला ५ कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणात आणि फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालला या प्रकरणात दोषी ठरवले होते. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपालला आपलं आयुष्य आणि करिअर पुन्हा शून्यातून सुरू करायचे आहे. राजपाल पुढील तीन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन काय खुलासा करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.