ना अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2', ना प्रभासचा 'कल्की 2898 एडी', 'हा' आहे 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:32 IST2024-12-29T15:31:45+5:302024-12-29T15:32:07+5:30

2024 मध्ये सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा कोणता, हे जाणून घेऊया.

Rajkummar Rao And Shraddha Kapoor Stree 2 Film Made Huge Profit Of 2024 | Allu Arjun Pushpa 2 | Prabhas's Kalki 2898 Ad | ना अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2', ना प्रभासचा 'कल्की 2898 एडी', 'हा' आहे 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा!

ना अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2', ना प्रभासचा 'कल्की 2898 एडी', 'हा' आहे 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा!

2024 मध्ये अनेक बिग बजेट सिनेमे रिलीज झाले. काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. तर काहींनी कोटींचा गल्ला जमवला. 1700 कोटी रुपयांच्या जगभरातील कलेक्शनसह, 'पुष्पा 2' हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. त्याचबरोबर प्रभासचा चित्रपट 'कल्की' या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण, तुम्हाला माहितेय या दोन्ही सिनेमांनी जास्त कमाई केली असली तरीही या सिनेमांनी सर्वाधिक नफा कमावलेला नाही. 2024 मध्ये सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा कोणता, हे जाणून घेऊया.

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आजही या चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे. या सिनेमानं 24 दिवसांत जगभरात 1597 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचे भारतातील एकूण कमाई 1346 कोटी रुपये आहे आणि परदेशात 251 कोटी रुपये जमवले आहेत. तर 2024 मध्ये प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ने 1100 कोटी रुपये कमवले आहेत. तर श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 चित्रपटानं 884 कोटी कमावले आहेत. 

'स्त्री 2' हा 60 कोटींमध्ये बनवण्यात आला. तर 'पुष्पा 2'चे बजेट 400 ते 500 कोटी आहे. यासोबतच 'कल्की 2898 एडी' 600 कोटींमध्ये बनला. अर्थात 'पुष्पा 2' आणि 'कल्की 2898 एडी' यांनी जास्त कमाई केली असली तरी त्यांचे बजेटही जास्त होते. पण, 'स्त्री 2' सिनेमानं आपल्या बजेटपेक्षा 10 पट अधिक कमाई केली आहे. त्यामुळे 'स्त्री 2' 'हा' 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा आहे. 

Web Title: Rajkummar Rao And Shraddha Kapoor Stree 2 Film Made Huge Profit Of 2024 | Allu Arjun Pushpa 2 | Prabhas's Kalki 2898 Ad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.