"मर्द तो शादी करते रहते है", लेकाच्या दुसऱ्या लग्नानंतर राज बब्बर असं म्हणाले? आर्यचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:44 IST2025-02-19T10:43:15+5:302025-02-19T10:44:00+5:30

प्रतीक बब्बरचा सावत्र भाऊ आर्यचा व्हिडिओ व्हायरल

raj babbar says mard to shadi karte rehte hai after son prateik babbar s second marriage | "मर्द तो शादी करते रहते है", लेकाच्या दुसऱ्या लग्नानंतर राज बब्बर असं म्हणाले? आर्यचा व्हिडिओ व्हायरल

"मर्द तो शादी करते रहते है", लेकाच्या दुसऱ्या लग्नानंतर राज बब्बर असं म्हणाले? आर्यचा व्हिडिओ व्हायरल

राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर १४ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. त्याने स्मिता पाटील यांच्याच बांद्रा येथील घरी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. लेकाच्या लग्नात राज बब्बर मात्र दिसले नाहीत. तसंच प्रतीकचा सावत्र भाऊही आला नाही. त्याच्या सावत्र भावाने नंतर अनके वक्तव्य केली. मात्र आता राज बब्बर यांची एक प्रतिक्रिया चर्चेत आहे.

प्रतीक बब्बरच्या सावत्र भावाचं नाव आर्य आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत भावाच्या लग्नाला न जाण्याबद्दल सांगितले. त्याने स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो म्हणतो, "मी सांगतो, लहानपणी मीडियावाले विचारायचे की तुमच्या वडिलांचं अफेअर सुरु आहे तुम्हाला कसं वाटतंय? आता तेच मीडियावाले विचारत आहेत की, 'तुमच्या भावाचं लग्न आहे आणि तुम्ही जाणार नाही?'  मी बाबांना विचारलं की मिडियाला काय उत्तर द्यायचं. तर बाबा म्हणाले, 'मर्द तो शादी करते रहते है'. 


यानंतर आर्य म्हणाला, 'माझ्या वडिलांनी दोन लग्न केले. मग माझ्या बहिणीनेही दोन लग्न केले. आता माझा सावत्र भाऊ प्रतीकनेही दुसरं लग्न केलं. इतकंच नाही तर माझा कुत्रा हॅपीच्या दोन गर्लफ्रेंड आहेत.'

राज बब्बर यांची पहिली पत्नी नादिरा बब्बर होती. १९८३ साली त्यांनी पत्नीला घटस्फोट देत स्मिता पाटील यांच्याशी लग्न केलं. 'भीगी पलके' सिनेमावेळी राज आणि स्मिता प्रेमात पडले होते. मात्र स्मिता पाटील यांचं १९८६ साली निधन झालं. लेकाच्या जन्मानंतर त्यांना त्रास झाला आणि १५ दिवसातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राज बब्बर पुन्हा नादिरा यांच्यासोबत राहू लागले. त्यांना आर्य हा मुलगा आणि जुही ही मुलगी झाली.
 

Web Title: raj babbar says mard to shadi karte rehte hai after son prateik babbar s second marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.