ना हमजा, ना रहमान डकैत! 'धुरंधर २' पाहून राघव चढ्ढा 'या' अभिनेत्याचे झाले फॅन, खास पोस्ट शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:12 IST2026-04-10T11:08:09+5:302026-04-10T11:12:10+5:30

Dhurandhar 2: 'या' अभिनेत्याच्या अभिनयावर राघव चढ्ढा फिदा,  कौतुक करत म्हणाले-"तुमचा ऑरा आजही …"  

raghav chadha praise sanjay dutt for dhurandhar 2 performance shares special post | ना हमजा, ना रहमान डकैत! 'धुरंधर २' पाहून राघव चढ्ढा 'या' अभिनेत्याचे झाले फॅन, खास पोस्ट शेअर करत म्हणाले...

ना हमजा, ना रहमान डकैत! 'धुरंधर २' पाहून राघव चढ्ढा 'या' अभिनेत्याचे झाले फॅन, खास पोस्ट शेअर करत म्हणाले...

Raghav Chadha Post: सध्या सर्वत्र 'धुरंधर  २' या सिनेमाची चर्च सुरु आहे.  चित्रपटाचं दिग्दर्शन, कलाकारांच्या अभिनयाची देखील सर्वजण प्रशंसा करत आहेत. प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळी देखील या सिनेमाचं भरभरुन कौतुक करत आहेत. अशातच आता अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती, राजकारणी राघव चढ्ढांनाही या चित्रपटानं भुरळ घातली असल्याचं पाहायला मिळतंय.

आदित्य धर लिखित, दिग्दर्शित 'धुरंधर २' हा सिनेमा मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय.पहिल्या दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.रणवीर सिंगपासून अर्जुन रामपालपर्यंत आणि चित्रपटातील इतर अनेक कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि इतर कलाकार मंडळी कौतुक करताना दिसत आहेत. अशातच आता राघव चढ्ढा यांनी 'धुरंधर 2' चित्रपट पाहिला असून ते संजय दत्तच्या अभिनयावर फिदा झाले आहेत. राघव यांनी नुकतंच त्यांच्या घरी संजय दत्तचं आदरातिथ्य केलं आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चित्रपटातील संजय दत्तचा अभिनय पाहून ते त्याचे फॅन झाले आहेत. 


या पोस्टला खास कॅप्शन देत राघव चड्ढा यांनी लिहिलंय, "काही काळापूर्वी माझ्या घरी संजय दत्तचे आदरातिथ्य करणं आनंदाची गोष्ट होती. ते मला माहीत असलेल्या सर्वात मनमिळाऊ व्यक्तींपैकी एक आहेत.'धुरंधर'साठी तुम्हाला जे प्रेम मिळत आहे, ते पाहून खूप आनंद झाला. तुमचा ऑरा आजही तसेच आहे आणि प्रत्येक काळात लोक तुम्हाला तितकेच पसंत करतात." राघव यांनी पुढे लिहिलंय,"संजय दत्त या यशाचे वाटेकरी आहात."

दरम्यान, 'धुरंधर' च्या यशानंतर  'धुरंधर: द रिव्हेंज' देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. या सिनेमात संजय दत्तने एस. पी. चौधरी अस्लमची भूमिका साकारली आहे. 

Web Title : राघव चड्ढा 'धुरंधर 2' में संजय दत्त के प्रदर्शन से हुए प्रभावित

Web Summary : राघव चड्ढा 'धुरंधर 2' से प्रभावित होकर संजय दत्त की मेजबानी की, एसपी चौधरी असलम के रूप में उनके प्रदर्शन की सराहना की. उन्होंने दत्त के स्थायी करिश्मा और सफलता की प्रशंसा की, बॉक्स ऑफिस पर फिल्म की जीत में उनकी महत्वपूर्ण भूमिका को स्वीकार किया.

Web Title : Raghav Chadha praises Sanjay Dutt's performance in 'Dhurandhar 2'.

Web Summary : Raghav Chadha, impressed by 'Dhurandhar 2,' hosted Sanjay Dutt, praising his performance as SP Chaudhary Aslam. He expressed admiration for Dutt's enduring charisma and success, acknowledging his pivotal role in the film's triumph at the box office.