राघव चड्ढा-परिणीती चोप्राच्या लग्नाची तारीख ठरली, कुठे घेणार "सात फेरे"? अशी सुरू आहे तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:55 PM2023-09-05T20:55:49+5:302023-09-05T21:02:02+5:30

23 आणि 24 सप्टेंबरला उदयपूरमध्ये हा लग्न सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज येणार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, यानुसारच बुकिंग देखील सुरू आहे. 

Raghav Chadha-Parineeti Chopra wedding date has been fixed on 23rd and 24th september The preparation is going on | राघव चड्ढा-परिणीती चोप्राच्या लग्नाची तारीख ठरली, कुठे घेणार "सात फेरे"? अशी सुरू आहे तयारी

राघव चड्ढा-परिणीती चोप्राच्या लग्नाची तारीख ठरली, कुठे घेणार "सात फेरे"? अशी सुरू आहे तयारी

googlenewsNext

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा याच महिन्यात उदयपूरमध्ये लग्नाच्य बंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. 23 आणि 24 सप्टेंबरला उदयपूरमध्ये हा लग्न सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज येणार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, यानुसारच बुकिंग देखील सुरू आहे. 

महत्वाचे म्हणजे, यासंदर्भात या दोघांकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. काही आठवड्यांपूर्वी परिणीती चोप्रा उदयपूर येथे आली होती. तिने येथे लग्नासंदर्भात व्हिजिट केली होती. एवढेचन नाही, तर तिने येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि उदयपूरसंदर्भात माहितीही घेतली होती. 

या हॉटेलमध्ये होऊ शकते लग्न - 
माध्यमांतील वृत्तांनुसार, परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी उदयपूरचे हॉटेल बुक केले आहे. त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम लीला पॅलेस आणि उदयविलास हॉटेलमध्ये होण्याची शक्यता असून पाहुण्यांची राहण्याची व्यवस्थाही येथेच करण्यात येणार आहे. या दोन्ही स्टार हॉटेल्समध्ये बुकिंग देखील झाली आहे आणि याची तयारीही सुरू झाली आहे. या लग्नासाठी राजकीय आणि चित्रपट सृष्टीतील अनेक स्टार्स उपस्थित राहतील असेही बोलले जात आहे.

23 सप्टेंबरपासून सुरू होतील कार्यक्रम -
राघव आणि परिणीती यांचा विवाह सोहळा 23 आणि 24 सप्टेंबरला पार पडेल. 22 तारखेपासून पाहुणे मंडळी  येण्यास सुरूवात होईल. 23 सप्टेंबरपासून मेहंदी, हळद आणि संगीताचे कार्यक्रम सुरू होतील. तत्पूर्वी 13 मे रोजी परिणीती आणि राघव यांचे दिल्लीत रिंग सेरेमनी पार पडले होते.

Web Title: Raghav Chadha-Parineeti Chopra wedding date has been fixed on 23rd and 24th september The preparation is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.