लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच भारतात आली राधिका आपटे, क्युट फोटो बघा; कॅप्शननेही वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:15 IST2025-04-01T15:12:14+5:302025-04-01T15:15:46+5:30
लेकीच्या जन्मानंतर राधिका पहिल्यांदाच मुंबईत आली आहे.

लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच भारतात आली राधिका आपटे, क्युट फोटो बघा; कॅप्शननेही वेधलं लक्ष
अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) काही महिन्यांपूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला. राधिका पती बेनेडिक्ट टेलरसोबत लंडनमध्येच स्थायिक आहे. तिथेच तिने लेकीला जन्म दिला. राधिकाने लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर येत सर्वांना सरप्राईज दिलं होतं. कारण तेव्हाच ती प्रेग्नंट असल्याचं बेबी बंपवरुन कळलं होतं. राधिकावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. गेल्या वर्षीच डिसेंबर महिन्यात ती आई झाली. आता राधिका लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच भारतात परतली आहे.
राधिका आपटेने इन्स्टाग्रामवर खूपच क्युट फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने आपल्या अवघ्या तीन महिन्यांच्या लेकीला छातीशी घट्ट बांधलं आहे. यात तिने लेकीचा चेहरा मात्र लपवला आहे. राधिका एखाद्या अॅडव्हेंचरवर असल्यासारखे तिने हावभाव केले आहेत. या फोटोसोबत तिने लिहिलेलं कॅप्शन खूपच मस्त आहे. ती लिहिते, "मातृभूमीत पाऊल ठेवलं. आईने मुंबईशी ओळख करुन देण्यासाठी काय चांगला महिना शोधलाय. 'शॉक्ड, मँगो सीझन, हॉट हॉट' असे हॅशटॅग तिने दिले आहेत.
लंडनहून थेट मुंबईत आल्याने वातावरणात मोठा फरक पडतो. त्यात मुंबईतलं चांगलाच उन्हाळा आहे याची राधिकाला कल्पना आहेच. म्हणून तिने असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. राधिकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं मुंबईत स्वागत केलं आहे. दिया मिर्झा, झोया अख्तर यांनीही तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. राधिकाला पुन्हा मुंबईत आल्याचं पाहून चाहतेही खूश आहेत.
वर्कफ्रंट
राधिका आपटेने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. 'कोट्या' या सिनेमाचं ती दिग्दर्शन करणार आहे. हा अॅक्शन फँटसी सिनेमा असणार आहे. विक्रमादित्य मोटवानी सिनेमाची निर्मिती करत आहेत.