रहस्यमय कथा अन् खिळवून ठेवणारा ट्विस्ट! OTT वरील 'हा' ट्रेंडिंग सिनेमा पाहणं चुकवू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:30 IST2025-09-04T14:27:35+5:302025-09-04T14:30:56+5:30
हत्येनं सुरू होते कहाणी अन् शेवटपर्यंत उलगडत नाही रहस्य; OTT वर आहे उपलब्ध हा सिनेमा, तुम्ही पाहिलात का?

रहस्यमय कथा अन् खिळवून ठेवणारा ट्विस्ट! OTT वरील 'हा' ट्रेंडिंग सिनेमा पाहणं चुकवू नका
OTT Movies: ओटीटीसारख्या माध्यमामुळे चित्रपटप्रेमींसाठी मनोरंजनाचा खजिना उपलब्ध झाला आहे. वेगवेगळे थ्रिलर, रोमॅन्टिक तसेच अॅक्शनपट देखील या प्लॅटफॉर्मवर पाहणं सहज शक्य झालं आहे.त्यामुळे प्रेक्षकांचा कल या माध्यमाकडे वाढला आहे. असाच एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहून अंगावर काटा येईल. हा चित्रपट पाहताना कोणाही शेवटपर्यंच स्क्रिनवरून नजर हटवू शकणार नाही.रात अकेली है असं या चित्रपटाचं नाव आहे. हा हिंदीतील एक उत्कृष्ट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.
२०२० साली प्रदर्शित झालेला हा क्राइम थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. हनी त्रेहान यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्धिकी आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटाची कथा एका व्यक्तिच्या खुनाभोवती फिरते जो त्याच्या लग्नाच्या रात्रीच मृतावस्थेत आढळतो.या खुनाची तपसणी पोलिस अधिकाऱ्याकडे सोपवली जाते. या गुन्ह्याचा उलगडा करताना चित्रपट दाखवले गेलेले ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
लक्षवेधी कथानक आणि कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्धीकीसह, स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव,श्वेता त्रिपाठी,इला अरुण, खालिद तैयबजी, शिवानी रघुवंशी आणि तिग्मांशू धुलिया यांच्याही भूमिका आहेत.'रात अकेली है' हा चित्रपट ग्रामीण भारतातील भ्रष्टाचार, सामाजिक रूढी आणि पुरुषप्रधानतेवर आधारित आहे. ही मर्डर मिस्ट्री खूप चांगल्या पद्धतीनं रुपेरी पडद्यावर साकारण्यात आली आहे. सध्या ओटीटीवर हा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.