आर. माधवनला पत्नीने दाखवला होता बाहेरचा रस्ता, अभिनेत्याला काढलं होतं घराच्या बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 10:30 IST2026-02-16T10:30:00+5:302026-02-16T10:30:00+5:30

R.madhavan: कोविड 19 चा काळ सुरु होण्यापूर्वीच माधवनने त्याच्या कामातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता.

r-madhavan-recalls-wife-sarita-advice-during-covid19-amid-dhurandhar-success | आर. माधवनला पत्नीने दाखवला होता बाहेरचा रस्ता, अभिनेत्याला काढलं होतं घराच्या बाहेर

आर. माधवनला पत्नीने दाखवला होता बाहेरचा रस्ता, अभिनेत्याला काढलं होतं घराच्या बाहेर

कलाविश्वातील धुरंधर अभिनेता म्हणजे आर. माधवन. साऊथसह बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या या अभिनेत्याने मॅड होऊन तरुणाईला अक्षरश: वेड लावलं. 'रहना हैं तेरे दिल में' मधल्या मॅडीची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये तितकीच आहे. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्याचीही चर्चा कायम नेटकऱ्यांमध्ये होते. आर. माधवन आणि त्याच्या पत्नीची लव्हस्टोरी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, या दिग्गज अभिनेत्याच्या प्रेमात असलेल्या त्याच्या पत्नीनेच एकदा त्याला चक्क घराच्या बाहेर काढलं होतं.

बॉलिवूडसह साऊथमध्येही माधवन उत्तमरित्या सक्रीय आहे. त्यामुळेच गेल्या ६ महिन्यांमध्ये त्याचे बॅक टू बॅक ३ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. उत्तम अभिनय कौशल्यामुळे माधवनला आपल्या सिनेमात घेण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक उत्सुक असतात. परंतु, एक काळ असा होता. ज्यावेळी त्याच्या हातात काम नव्हतं. आणि, या परिस्थितीत त्याच्या पत्नीनेही त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानेच या गोष्टीचा खुलासा केला आहे.

पत्नीने काढलं माधवनला घराबाहेर

अलिकडेच माधवनने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या करिअरविषयी भाष्य केलं आहे. कोविड 19 चा काळ सुरु होण्यापूर्वीच माधवनने त्याच्या कामातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. त्यावेळी तो एकाच वेगळ्याच फेजमध्ये होता. मात्र, या सगळ्यातून त्याच्या पत्नीने त्याला बाहेर काढलं, असं माधवन म्हणाला. "माझी पत्नी मला कायम म्हणते, तू कधीच तुझ्या कामातून बाहेर पडू शकत नाही. तू तमिळ कॉमेडी करतो, तमिळ अॅक्शन करतोस,  OTT वर काम करतोस. अगदी हिंदी, इंग्लिश OTT सुद्धा करतोस. मग आताच तू घरात का बसला आहेस. मला याच गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय. त्यामुळे उठ आणि बाहेर पड. काही तरी काम कर आणि पैसे कमव", असं सरिताने आर. माधवनला सांगितलं होतं.

पुढे तो म्हणतो, "२०२० मध्येच सरितान मला घराबाहेर काढलं आणि काम करण्यासाठी पुन्हा प्रोत्साहन दिलं". दरम्यान, माधवनची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'धुरंधर'चा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या भागातही माधवनची भूमिका महत्त्वाची आहे. 'धुरंधर'मध्ये माधवनने अजय सान्याल ही भूमिका वठवली आहे.
 

Web Title : आर माधवन को पत्नी ने घर से बाहर निकाला था एक बार।

Web Summary : आर माधवन की पत्नी, सरिता ने करियर ब्रेक के दौरान उन्हें काम करने के लिए प्रेरित किया। उन्होंने उन्हें घर पर बेकार बैठने के बजाय पैसे कमाने के लिए प्रोत्साहित किया, जिससे उनकी अभिनय में वापसी हुई।

Web Title : R. Madhavan's wife once kicked him out of the house.

Web Summary : R. Madhavan's wife, Sarita, pushed him to work during a career break. She urged him to earn money instead of staying idle at home, leading to his return to acting.