'धुरंधर' सिनेमावर का होतेय टीका? आर माधवनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "काही लोक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:40 IST2025-12-12T15:38:52+5:302025-12-12T15:40:04+5:30
मला सुरुवातीपासूनच माहित होतं की...

'धुरंधर' सिनेमावर का होतेय टीका? आर माधवनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "काही लोक..."
सध्या सगळीकडे 'धुरंधर' सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावरही सिनेमाचे रील्स येत आहेत. अक्षय खन्नाच्या डान्सचं, स्वॅगचं विशेष कौतुक होत आहे. शिवाय संजय दत्त, रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी यांनीही कमाल काम केलं आहे. तर आर माधवनने सिनेमात आयबी चीफ अजय सान्याल यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाबाबतीत सुरु असलेल्या वादावर आर माधवनने आता उत्तर दिलं आहे.
पूजा तलवारला दिलेल्या मुलाखतीत आर माधवन म्हणाला, "मला सुरुवातीपासूनच माहित होतं की या सिनेमानंतर समाजात मोठा परिणाम दिसेल. असे काही लोक असतील ते सिनेमाला वाईट रेटिंग देतील. रंग दे बसंती असो किंवा ३ इडियट्स या सिनेमांनाही टीकेला सामोरं जावं लागलं. वादात्मक प्रतिक्रियांनंतरही दोन्ही सिनेमांनी तुफान कामगिरी केली. रिलीजआधीच सिनेमांवर टीका करण्याचा "
तो पुढे म्हणाला, "सुरुवातीला दिलेले नकारात्मक रिव्ह्यूचा काहीही संबंध नसतो पण कालांतराने हे काम प्रेक्षकांना भावते. ज्यांनी २ रेटिंग्स दिले ते आज कालबाह्य झाले आहेत. आम्ही अजूनही इंडस्ट्रीत आहोत. मी हे काही द्वेषाने सांगत नाहीये. पण तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. आता प्रगती करण्याची वेळ झाली आहे. बदलत्या कथानक शैलीनुसार कलाकार, फिल्ममेकर, आणि क्रिटिक्सने एकत्र पुढे गेलं पाहिजे. या बदलाची इंडस्ट्रीला गरज आहे."
युट्यूब रिव्ह्यूजवर आर माधवन म्हणाला, "आयुष्यात त्यांच्या मतांना किती महत्व द्यायची गरज आहे हे मला पाहायचंय. काही क्रिटिक्स, काही रिव्ह्यूज खरोखर सिनेमाचं परीक्षण करतात. त्यांना चित्रपट परीक्षणाबद्दल ज्ञान असतं. पण जेव्हा सिनेमाच्या रिलीजआधीच तुम्ही त्याबद्दल निगेटिव्ह रिव्ह्यू देत असाल तर तुमचं महत्व माझ्यासाठी कमी होतं."