विकी कौशलच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी असं काय घडलं? PVR-INOX ला ठोठावला १ लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:56 IST2025-02-19T18:43:57+5:302025-02-19T18:56:28+5:30
विकी कौशलच्या सिनेमाच्या शोदरम्यान PVR-INOX ने केलेल्या एका चुकीमुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे (Vicky kaushal)

विकी कौशलच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी असं काय घडलं? PVR-INOX ला ठोठावला १ लाखाचा दंड
आजकाल सिनेमागृहांमध्ये सिनेमा सुरु व्हायच्या आधी जाहिराती दाखवण्यात येतात. सिनेमाच्या आधी या जाहीराती दिसतात. परंतु जेव्हा 'पुष्पा २'सारखा एखादा ३ तास ३० मिनिटांचा वगैरे सिनेमा असेल. या जाहीराती सुरुच राहिल्या तर तुमचा किती वेळ वाया जाईल? अशीच काहीशी घटना विकी कौशलच्या (vicky kaushal) सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान घडली. त्यामुळे PVR-INOX थिएटरला १ लाखाचा दंड ठोठावण्यात आला. नेमकं काय घडलं?
PVR-INOX ला ठोठावला १ लाखाचा दंड
झालंय असं की, थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेलेल्या एका व्यक्तीने कोर्टात याविषयी खटला दाखल केला होता. २०२३ साली डिसेंबरमध्ये आलेल्या 'सॅम बहादुर' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान PVR-INOX ने सिनेमाआधी तब्बल २५ मिनिटं जाहीराती दाखवल्या. त्यामुळे वेळ वाया गेल्याने वैतागलेल्या व्यक्तीने थेट PVR-INOX मल्टिप्लेक्सविरोधात कोर्टात केस दाखल केली. या केसचा निकाल लागला असून कोर्टाने PVR-INOXला १ लाखांचा दंड ठोठावला आहे.
कोर्टात त्या व्यक्तीने याचिका दाखल केली. त्यानुसार त्याने लिहिलंय की, "वेळ खूप मौल्यवान आहे. त्यामुळे कोणीतरी तुमच्या वेळेचा पैसा कमावण्यासाठी वापर करत असेल तर ते चुकीचं आहे. त्याला तो हक्क नाहीये." कमिशनने PVR ला आदेश दिलाय की, त्यांनी तिकिटावर सिनेमा सुरु होण्याची योग्य वेळ द्यावी. याशिवाय सिनेमाच्या शोटाईमनंतर जाहीराती दाखवू नयेत. त्यामुळे याचिकाकर्त्याला मानसिक त्रास दिल्यामुळे २० हजार रुपये याशिवाय संपूर्ण तक्रारीचा खर्च ८००० रुपये अशी नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला गेलाय. परिणामी PVR-INOX या दोन्ही मल्टिप्लेक्सला १ लाख रुपये दंड ठोठवण्यात आलाय.